एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीने ओवैसी यांनी अलीकडेच बुलढाणा येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेत औरंगाजेबाच्या नावाने कथित घोषणाबाजी केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून औरंगाजेबाच्या नावाने दिलेल्या घोषणाबाजीचा निषेध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे बुलढाणा येथील सभेत औरंगाजेबाच्या नावाने कसलीही घोषणाबाजी झाली नाही, असं स्पष्टीकरण स्वत: असदुद्दीन ओवैसी यांनी दिलं आहे. प्रसारमाध्यमांमधून खोट्या बातम्या पसरवल्या जात असून मुस्लिमांचा द्वेष केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ओवैसी यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही हा वाद थांबत नाहीये. दरम्यान, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी ओवैसी यांनी थेट इशारा दिला आहे.

हेही वाचा- VIDEO: “देशात औरंगजेबाचं रक्त कुणामध्येही नाही, इथले मुस्लीम…”, फडणवीसांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरे यांचं सरकार नाही. त्यामुळे तुमच्या घोषणा आणि भडकाऊ भाषणं ऐकून घेतली जाणार नाहीत. ओवैसींनी आपल्या मर्यादेत राहावं. राज्यात औरंगाजेबाच्या नावानं दिलेल्या घोषणा चालणार नाहीत, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ओवैसींना लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा- औरंगजेबाच्या कथित घोषणाबाजीवर ओवैसींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही मुस्लिमांचा…”

संबंधित व्हिडीओत नवनीत राणा म्हणाल्या, “मागील काही दिवसांपासून असदुद्दीन ओवैसी सातत्याने महाराष्ट्रात येत आहेत. ते कधी औरंगजेबाच्या नावानं घोषणा देतात, तर कधी व्यासपीठावर उभं राहून भडकाऊ भाषणं देतात. पण ओवैसी यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार नाही. जिथे तुमच्या घोषणा किंवा भडकाऊ भाषणं ऐकून घेतली जातील. त्यामुळे ओवैसींनी आपल्या मर्यादेत राहावं. ती मर्यादा पार करण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात. येथे ओवैसींचे भडकाऊ भाषण आणि औरंगजेबाच्या घोषणा चालणार नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि त्यानंतरच महाराष्ट्रात येण्याची हिंमत दाखवावी.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana on aimim leader asaduddin owaisi aurangazeb slogan in buldhana rally rmm