उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एकत्रिपणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रफुल्ल पटेल अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. ३० जूनला महत्वाची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर, अजित पवार यांनी माझी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

“अनिल पाटील यांना विधानसभेचे आणि अमोल मिटकरी यांची विधानपरिषदेचे प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे,” असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

शरद पवार यांचे फोटो वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मग, तुम्ही अधिकृत पक्ष सांगता, तर पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यावर शरद पवार गटाला बंदी घालणार का? पक्ष कार्यालयावर हक्क कधी सांगणार? असे विचारल्यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, “पक्षाचे कार्यालय आमचं आहे, असं गृहित धरून रस्त्यावरील लढाई करण्यासाठी आम्ही उतरू इच्छित नाही. कारण, असं चुकीचं काम करून कोणालाही फायदा होणार नाही.”

हेही वाचा : पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले “राष्ट्रवादीबरोबर आल्याने…”

“कायदेशीर बाजू मांडण्याचं काम आम्ही करू. अशोभनीय काम करण्याची इच्छा अजिबात नाही. नियमांप्रमाणे पुढील कारवाई करत होतो आणि करत राहणार,” असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन; म्हणाल्या, “राहुल गांधी आणि सोनिया गांधींना…”

नागालँडमधील आमदारांसह अन्य राज्यांतील सदस्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे का? या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं की, “आम्ही याबाबत निवडणूक आयोगाकडे जे सांगायचे होतं. ते सांगितलं आहे. यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होईल. तेव्हा सर्व स्पष्ट होणार आहे.”