महाविकास आघाडी विस्कळीत होत असल्याने संजय राऊत भांबावले आहेत. त्यामुळे त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाभारताचे दाखले द्यावे लागत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर धूसफूस, विसंवाद असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आघाडी करण्यामध्ये संजय राऊतांची महत्त्वाची भूमिका होती. आता हीच आघाडी विस्कळीत होत आहे. त्यामुळे संजय राऊत भांबावले आहेत. त्यामुळे त्यांना महाभारताचे दाखले देत आपली भूमिका, आपलं अस्तित्व कसं योग्य आहे आणि भारतीय जनता पार्टी कशी भूमिकेत आहे, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा सुरु आहे, असंही दरेकर म्हणाले.


या आधीही दरेकरांनी संजय राऊतांवर शेलकी टीका केली होती. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी, असा सल्ला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला होता. राष्ट्रवादीची चिंता केल्यामुळे शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

हेही वाचा- संजय राऊतांनी फडणवीस, राष्ट्रवादीची काळजी करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी; दरेकरांचा पलटवार

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या वक्तव्यावरुन संजय राऊत आम्ही फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, असं म्हणाले होते. त्याचबरोबर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातूनही शिवसेनेने फडणवीसांना चिमटे काढले होते. त्यावर प्रविण दरेकरांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin darekar again criticizes sanjay raut saying thats why he has to give examples from mahabharata vsk