Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide: ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून किमान ४० ते ५० घरं मलब्याखाली गाडली गेल्याचं सांगितलं जात आहे. अजूनही घटनास्थळी पाऊस चालू असल्यामुळे एनडीआरएफच्या बचाव पथकांना मदतकार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदिती तटकरे आदी नेतेमंडळीही घटनास्थळी दाखल झाली आहेत.
Raigad Irshalgad Landslide Live Today: ठाकूरवाडीवर काळाचा घाला, दरड कोसळून गाव ढिगाऱ्याखाली दबलं!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळीच ईर्शाळगडाच्या पायथ्याशी दाखल, बचाव कार्यावर लक्ष ठेवून…
https://twitter.com/mieknathshinde/status/1681894859408564225
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी केली चर्चा
१६ ते १७ घरांवर दरड कोसळली आहे. आत्तापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य चालू आहे. एनडीआरएफसह स्थानिक बचावपथकं काम करत आहेत. वर जायला पक्का रस्ता नसल्यामुळे मलबा काढण्यासाठी यंत्रांचा वापर करता येत नाहीये. गिरीश महाजन वर गावात आहेत – एकनाथ शिंदे
रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. माळीण आणि तळीये दुर्घटनेची आठवण करून देणाऱ्या या घटनेने राज्य हादरलंय. रात्री ११-१२ च्या सुमारास इर्शाळवाडीत दरड कोसळून १०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. एनडीआरएफ, पोलीस, जिल्हा प्रशासन, पनवेल आणि मुंबई महापालिकेची बचावपथकं रात्रीच इर्शाळवाडीत दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत २५ हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढलं आहे. तर या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.
रायगड येथील इर्शाळगड येथे दरड कोसळून अनेकजण बेपत्ता झाले आहेत. १९ जुलैच्या रात्री ११ च्या सुमारास ही दरड कोसळल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, ही घटना समोर येताच सरकार घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे दाखल झाले असून पालकमंत्री उदय सामंत, आदिती तटकरेही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, या गावात दरड कोसळण्याची पहिलीच घटना असल्याचं अजित पवार म्हणाले.
बुधवारी रात्रीच्या सुमारास रायगडाच्या ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर दरड कोसळली असून ३० ते ४० घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत.
रायगडमधील ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. यावेळी नेमकं काय घडलं, याविषयी एका प्रत्यक्षदर्शीनं माहिती दिली आहे.
अशा ठिकाणांहून सक्तीने स्थलांतर करावं लागलं, तरी तशी भूमिका सरकारला भविष्यात घ्यावी लागेल – देवेंद्र फडणवीस
सध्या हवामानाचा पॅटर्न बदलला आहे. कमी दिवसांत जास्त पाऊस पडत आहे. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला होता. बचाव पथकं तयार ठेवण्यात आली होती. मात्र, प्रत्येक गोष्टीचा अंदाज लावणं अनेकदा कठीण जातं. अशा घटनांमधून प्रशासनाला शिकायला मिळतं. त्यामुळे अशी संवेदनशील ठिकाणं नव्याने निश्चिक करणं शक्य होणार आहे – देवेंद्र फडणवीस
नेमके किती लोक मलब्याखाली असतील, यासंदर्भात अद्याप खात्रीलायक माहिती देता येत नाहीये. पण बचावकार्य वेगाने चालू आहे. यंत्र पोहोचू शकत नसल्यामुळे बचावकार्य मॅन्युअली करावं लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, दादा भुसे, आदिती तटकरे तिथे पोहोचले आहेत. मुख्यमंत्री स्वत: बचावकार्यावर देखरेख ठेवत आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत – देवेंद्र फडणवीस
दरडीखाली आलेल्या घरांच्या मलब्यातून लोकांना वाचवण्याचे प्रयत्न बचाव पथकांकडून केले जात आहेत.
Raigad Irshalgad Landslide Live Today: रायगडमधल्या ईर्शाळगडावरील ईर्शाळवाडी गावावर काळाचा घाला!