प्रकाश आंबेडकरांच्या शरद पवारांवरील टीकेवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, "मी..." | ramdas athawale react on prakash ambedkar sharad pawar statement thogether with bjp ssa 97 | Loksatta

“शरद पवार आजही भाजपाबरोबर” प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

“प्रकाश आंबेडकरांना काय हवं, याची…”

Ramdas Athawale Prakash Ambedakar
रामदास आठवले प्रकाश आंबेडकर ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी ( २३ जानेवारी ) शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीची घोषणा केली. अद्यापही महाविकास आघाडीतले घटक काँग्रेस-राष्ट्रवादीशी युतीबद्दल चर्चा सुरु आहे. अशातच प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना लक्ष्य केलं. शरद पवार आजही भाजपाबरोबर आहेत, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. यानंतर राष्ट्रवादीकडून प्रकाश आंबेडकरांवर टीका करण्यात येत आहे. तर, आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही यावर भाष्य केलं आहे.

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेशी मी सहमत नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतर हा अडचणीचा विषय सोडवण्यासाठी शरद पवारांनी सहकार्य केलं. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांबद्दल शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे.”

हेही वाचा : “गौतम अदानी आणि पंतप्रधानांचे संबंध पाहता…”, ‘हिंडनबर्ग’च्या अहवालावरून काँग्रेसची चौकशीची मागणी; म्हणाले…

“प्रकाश आंबेडकरांना काय हवं, याची माहिती नाही. दुसऱ्या बाजूला संजय राऊतांना ओळखत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबरच्या युतीबद्दल साशंकता आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र राहतील, असं वाटत नाही,” अशी स्पष्ट भूमिका रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : “कल्याण-डोंबिवलीची जागा वाचली तरी पुरे” म्हणणाऱ्या राऊतांना शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आंबेडकरांनी तुमची…”

“उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तरी, त्याला शिवशक्ती आणि भीमशक्ती म्हणता येणार नाही. त्याला शिवशक्ती आणि वंचित शक्ती म्हणता येऊ शकते. या युतीने महाराष्ट्राच्या राजकारणात फारसा फरक पडेल, असं वाटत नाही,” असा दावाही रामदास आठवलेंनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 19:59 IST
Next Story
सातारा : खाऊचे पाकीट समजून ‘ड्रेन इन्स्टा’ खाल्ल्याने मुलाची जळाली अन्ननलिका