भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा-शिवसेनेमधील (शिंदे गट) जागावाटपावरून केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका सुरू केली आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी “फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे हे लोक आहेत” अशा शब्दात शिंदे गटावर हल्लाबोल केला. यावर आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर मिळालं आहे. रामदास कदम यांनी आज संजय राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना आमदार (शिंदे गट) रामदास कदम म्हणाले की, “आपणा सर्वांना माहिती आहे शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय, हे उभा देश ओळखतो. ज्याला कावीळ झालेली असते त्याला जग पिवळं दिसतं. म्हणूनच संजय राऊतांनी असं काहीतरी बोलणं हे हास्यास्पद आहे.”

रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

रत्नागिरीमधल्या खेड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या आयोजनासाठी रामदास कदम खेडमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच संजय राऊतांवर देखील हल्लाबोल केला.

हे ही वाचा >> “…आणि २१ लाख रुपये घेऊन जा” अंनिसचं पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्रींना जाहीर आव्हान

रामदास कदम म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांची खेड येथे सभा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले माझ्या हातात काही नाही, मी रिकाम्या हातांनी आलोय. परंतु मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांच्या कार्यकाळात लोकांना देण्यासाठी त्यांच्या हातात पुष्कळ गोष्टी होत्या. परंतु त्यांनी त्या दिल्या नाहीत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam slams sanjay raut over statement on bjp sena seat sharing asc