शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रामदास कदम हे सातत्याने शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. कदम यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अयोध्येला जाणार आहेत. अयोध्येला जाण्याचं प्रयोजन विचारल्यानंतर कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंना उध्वस्त करून राज्यात शिवशाही आणण्यासाठी रामचंद्राचा आशीर्वाद घ्यायला आम्ही अयोध्येला जात आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामदास कदम म्हणाले की, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बेईमानी करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरेंना उध्वस्त करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला शांती लाभावी, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवशाही महाराष्ट्रात पुन्हा आणावी, तसेच बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून व्हावं म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अयोध्येला जात आहोत.

हे ही वाचा >> “अजित पवार नॉट रिचेबल?” विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकारांना सुनावलं, म्हणाले, “बंद करा ते”

लवकरच दूध का दूथ होईल : कदम

रामदास कदम म्हणाले ती, चोर कोण आणि साव कोण याचा फैसला लवकरच होईल, लवकरच दूध का दूथ आणि पाणी का पाणी होईल. आमच्या आमदारक्या कोणी चोरल्या, नेत्यांची मंत्रिपदं कोणी चोरली ते मातोश्रीमध्येच बसलेत. सर्वकाही लवकरच कळेल, त्यांची (उद्धव ठाकरे आणि संजय राऊत) टीका म्हणजे सौ चूहे खा के बिल्ली हज को चली अशी आहे. त्यांची स्थिती म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल अशी आहे. सर्व खऱ्या गोष्टी लोकांच्या, राज्यातल्या जनतेच्या समोर याव्यात म्हणून आम्ही अयोध्येला जात आहोत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam slams uddhav thackeray ayodhya rally asc