रत्नागिरी : राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट जरी एकत्र आले, तरीही भाजप महायुतीच्या सत्तेवर कोणताच परिणाम होणार नाही. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी फक्त स्टंटबाजी केली जात असल्याचे मत भाजपाचे सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
भाजपाचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी भाजपच्या ११ वर्षाच्या कारकीर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले की, मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचे ठरविले आहे. मात्र यामध्ये राज्याच्या सरकार मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सत्तेत असले तरी, त्यांच्या केसेच सुरु आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी अशा लोकांना बरोबर घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. १३ कोटी लोकांच्या पसंतीने देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री झाले आहेत. महायुतीचे सरकार रोज नवनवीन योजना गोरगरिबांच्या हितासाठी राबवत आहेत. मुंबई महानगर पालिका वगळता इतर ठिकाणी झालेली चारची प्रभाग रचना ही प्रभागाचा विकास झाल्याने करण्यात आली आहे. त्यामुळे येथील प्रभागावर नगरसेवकांना लक्ष ठेवणे सोपे होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
राजकारणांमध्ये तारतम्य असणे गरजेचे असते. मात्र मनसे नेते महाजन यांच्याकडे ते दिसत नाही, असे ही महाजन आणि खासदार नारायण राणे यांच्यातील वादावर प्रतिक्रिया देताना सरचिटणीस विक्रांत पाटील म्हणाले.
राज्यात होणा-या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां बाबत वरिष्ट पातळीवरील नेते निर्णय घेतील. मात्र या निवडणुकांच्या तयारीला भाजप पक्ष लागला असल्याचे ही पाटील यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात येणा-या कोणत्याही प्रकल्पाबाबत राजकारण होवू नये. हे प्रकल्प पुर्ण प्रकिया होवून येत असतात. त्यासाठी बराच कालावधी लागलेला असतो. तसेच मुंबई गोवा महामार्ग २०२६ पर्यत पुर्ण होणार असल्याचे पाटील यांनी शेवटी सांगितले.