बंगळुरात ‘इंडिया’ आघाडीची स्थापना होताच मोदी–शहा यांनी दिल्लीत ‘एनडीए’चा जीर्णोद्धार केला. हेच ‘इंडिया’ आघाडीचे यश. देशातील लोकशाही रोज मारली जात आहे. ईडी, सीबीआय, ईव्हीएम ही शस्त्रे देशातील जनतेला गुलामगिरीकडे ढकलत आहेत. राजकारणात मन मोठे असावे लागते. ती दिलदारी संपलीच होती. बंगळुरात त्या दिलदारीचे नवे रोपटे उगवताना दिसले, असे मत खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’मध्ये व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“बंगळुरात 26 राजकीय पक्षांची बैठक झाली ती 18 तारखेस. त्याच दिवशी दिल्लीतील अशोक हाटेलात ‘एनडीए’ म्हणून 36 पक्षांचे संमेलन भाजपाने घेतले व मोदींनी त्यात नेहमीप्रमाणे, नेहमीच्याच पठडीतील भाषण केले. “2024 सालीही आम्हीच जिंकणार. आम्हालाच मत देण्याचे लोकांनी ठरवले आहे,” असे मोदी म्हणतात. आम्हीच जिंकणार व आम्हीच दोन-चार लोक सत्ता राबवणार. हे सर्व ऐकले तेव्हा वाटले, भारतीय राजकारण हे आता मतदारांवर अवलंबून नाही. ते फक्त मोदी, शहा, ईडी, सीबीआय, उद्योगपती अदानी व अंबानी ठरवतात,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा : ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांवर निधीवर्षांव; अर्थमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच अजित पवारांकडून खास तरतूद

“‘इंडिया’ नाव ठेवले म्हणून टीका करणाऱ्यांना राहुल गांधी यांनी बंगळुरात उत्तर दिले. हा लढा देशासाठी म्हणूनच ‘इंडिया’ हे नाव. ते योग्यच आहे. आम्हीच जिंकू व जनता आम्हालाच मत देईल, असे सांगणाऱ्यांचा अहंकार फार काळ टिकणार नाही हे बंगळुरातील हवेने स्पष्ट केले,” असे संजय राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा : “…हा आततायीपणा आहे”, अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीवर गिरीश महाजनांचं विधान

“देशाच्या राजकारणातून २०१४ पासून दिलदारीचे पूर्ण उच्चाटन झाले. त्या दिलदार इंडियाचे नवे रोपटे पुन्हा बंगळुरूच्या भूमीत लागले. २०२४ पर्यंत त्याचा महावृक्ष होवो!,” अशी आशा संजय राऊत यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on pm narendra modi upa meeting and benguluru india meeting ssa