वाई : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ६ जुलै रोजी साताऱ्यात येणार आहे. पालखी सोहळ्याचा जिल्ह्यात पाच दिवस मुक्काम असणार आहे. या दृष्टीने प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून आळंदीतून सुरू होणार आहे. हा सोहळा दि. ६ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात येणार आहे. यावर्षी सोहळ्याचे जिल्ह्यात पाच मुक्काम राहणार आहेत. तर ११ जुलै रोजी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करुन पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालखी सोहळा पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून प्रस्थान करत सोहळा पंढरपूरला जातो. दि. ६ जुलै रोजी पालखी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात लोणंद प्रवेश करणार आहे. रात्रीचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे. तर दि. ७ रोजीही लोणंद येथेच मुक्काम असेल. तर दि. ८ जुलै रोजी सकाळचा विसावा व दुपारचे भोजन लोणंद येथे घेऊन पालखी लोणंद येथून मार्गस्थ हेाईल.

हेही वाचा : “पूर्ण माहिती घेऊनच बोला”, ‘त्या’ विधानावरून सुनील तटकरेंनी टोचले अमोल मिटकरींचे कान; म्हणाले, “काही लोक जाणीवपूर्वक…”

दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब तरडगाव (ता फलटण)येथे होईल , येथे वारीतील पहिले उभे रिंगण होईल. मुक्काम तरडगाव (ता. फलटण )येथे होणार आहे. ९ जुलै रोजी सकाळी तरडगाव येथून पालखीचे प्रस्थान होईल. त्यानंतर सकाळचा विसावा दत्तमंदिर काळज, दुपारचे भोजन निंभोरे ओढा आणि विसावा वडजल (ता फलटण)येथे राहील. त्यानंतर रात्रीचा मुक्काम फलटण येथे राहणार आहे.

हेही वाचा : “बारामतीच्या निवडणुकीची रशियात चर्चा”, शरद पवारांचं विधान; म्हणाले, “पीटर नावाचा मुलगा…”

दि. १० जुलै रोजी सकाळी फलटण येथून पालखीचे प्रस्थान होईल. सकाळचा विसावा विडणी, दुपारचे भोजन पिंपरद, विसावा निंबळक फाटा येथे असेल. तर रात्रीचा मुक्काम बरड येथे असणार आहे. दि. ११ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील प्रवेशासाठी बरड येथून पालखीचे प्रस्थान होईल. त्यानंतर सकाळचा विसावा साधबुवाचा ओढा तर दुपारचे भोजन धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ होईल. त्यानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. सोलापूरमधील रात्रीचा मुक्काम हा माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे राहणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant dnyaneshwar maharaj palkhi stay in satara for five days from 6th july css