नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं. काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष आमदार यांच्यावर भाजपाची मदत घेतल्याचा आरोपही झाला. आता विजयानंतर सत्यजीत तांबे विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार सुजय विखे यांच्या भेटीबाबत सत्यजीत तांबेंनी सूचक विधान केलं. ते रविवारी (१९ फेब्रुवारी) अहमदनगरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा खासदार सुजय विखेंना भेटणार का? या प्रश्नावर सत्यजीत तांबे म्हणाले, “मी खासदार सुजय विखे यांच्याशी संपर्क केला होता. मी लवकरच त्यांना भेटणार आहे. ते सध्या परदेशात आहेत. ते इकडे आल्यानंतर मी त्यांनाही भेटेन.”

“मला सगळ्याच राजकीय पक्षाच्या त्यांनी मदत केली”

“मला सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मदत केली आहे. मी त्याचं कारण सांगितलं आहे. आमचा ऋणानुबंध सगळ्यांशी आहे. आम्ही राजकारण फक्त निवडणुकीपुरतं करतो. निवडणूक संपली की, आम्ही सगळ्यांना मदत करतो,” असं मत सत्यजीत तांबेंनी व्यक्त केलं.

“…त्यामुळेच आम्हाला सगळे मदत करत असतात”

“विचाराची लढाई विचारांनी लढता येते. त्यासाठी रोजच राजकारण केलं पाहिजे, असं गरजेचं नाही. हे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळेच आम्हाला सगळे मदत करत असतात आणि आम्हीही सर्वांना मदत करत असतो. त्यामुळे जशी परिस्थिती निर्माण होईल तशी भूमिका घेतली जाईल,” असं सूचक वक्तव्यही सत्यजीत तांबेंनी केलं.

हेही वाचा : सत्यजीत तांबे भाजपात प्रवेश करणार? ‘त्या’ ट्वीटवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

व्हिडीओ पाहा :

“निवडणूक आयोगाने खूप तांत्रिकपणे हा निर्णय दिला”

सत्यजीत तांबे म्हणाले, “हा विषय फार तांत्रिक आहे. कारण एका बाजूला त्या पक्षाची घटना आणि दुसऱ्या बाजूला लोकांचा पाठिंबा असा मुद्दा आहे. अशात निवडणूक आयोगाने खूप तांत्रिकपणे हा निर्णय दिला आहे. त्यामुळे तो निर्णय समजून घेणं आणि त्यावर अभ्यास करणं हे कायदेपंडितांचा विषय आहे.”

हेही वाचा : शिवसेनेची कार्यालयं, देणग्या, संपत्ती आणि निधीवर कोणाचा अधिकार? कायदेतज्ज्ञ श्रीहरी अणे स्पष्टच म्हणाले…

“…म्हणून मला या विषयावर टिपण्णी करण्याची गरज नाही”

“म्हणून मला असं वाटतं की हा खूप किचकट कायदेशीर प्रक्रियेतून झालेला निर्णय आहे. त्यामुळे मला त्यावर अधिकचं माहिती नाही. मी अपक्षच आहे. त्यामुळे मला या विषयावर फार टिपण्णी करण्याची गरज नाही,” असंही सत्यजीत तांबे यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satyajeet tambe comment on meeting with bjp mp sujay vikhe rno news pbs