धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा संभाजी ब्रिगेड कडून होणारा एकेरी उल्लेख याचा आज दिनांक 25 रोजी शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सचिन खुडे, कृष्णा शिरसागर, सचिन खुडे, सचिन नेटके, यश बोरा, पांडू वळू, ओम पवार, राजेंद्र येवले, किशोर सुद्रिक, बजरंग कदम, निलेश पारखे, अमोल गायकवाड, राम नेटके, व सोमा डमरे हे उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज सकाळी शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कार्यकर्ते कर्जत तहसील कार्यालय परिसरामध्ये जमले व त्यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन देखील केले. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करत छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड या संघटनेचा निषेध केला. यावेळी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्तान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र व स्वराज्याचे दुसरे छत्रपती आहेत. त्यांची ख्याती जग विख्यात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची हिंदू धर्माप्रती जे बलिदान आहे ते जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत विसरले जाणार नाही. म्हणून रयतेने त्यांना धर्मवीर ही उपाधी दिली. आज संभाजी ब्रिगेड ही संघटना त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करते ही गोष्ट अखंड महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे.

आज संभाजी ब्रिगेडच्या कुठल्याही कामाविषयी सोशल मीडियामध्ये असेल किंवा जनमानसांमध्ये असेल चर्चा करत असताना जो पहिला उदगार निघतो तो संभाजी असा होत आहे. त्यामुळे कळत नकळत रोज लाखो करोडो लोकांकडून आपल्या राजाचा एकेरी उल्लेख करून अपमान होत आहे.तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील सर्व शंभूराजे प्रेमींच्या वतीने विनंती आहे की ,एक तर संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव बदलण्याचे आदेश द्यावेत ,अन्यथा या संघटना व पक्ष यांचे धर्मादाय आयुक्त मार्फत परवाने रद्द करावे अशी मागणी या निवेदनामध्ये दीपक काटे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv dharma foundation maharashtra protested sambhaji brigades mention of dharmaveer chhatrapati sambhaji maharaj on 25th sud 02