“मोदींनी मसणात जा”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर दिपाली सय्यद भडकल्या!

दिपाली सय्यद म्हणतात, “…तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या!”

dipali sayed chandrakant patil bjp supriya sule
दिपाली सय्यद यांची चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानावर टीका!

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आता चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यातल्या संवादापर्यंत येऊ पोहोचले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून सध्या वाद निर्माण झाला असून त्याचा सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे. सुप्रिया सुळेंना उद्देशून चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे या पक्षांमधील महिला नेत्यांकडून देखील टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी चंद्रकांत पाटील आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

कुठून सुरू झाला वाद?

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानावरून हा कलगीतुरा सुरू झाला. “ओबीसी आरक्षणासंदर्भात आपण एकत्र लढायचे असे ठरले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असं काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे”, असं त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांनी त्यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला. “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

“घरी जा आणि स्वयंपाक करा” म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी त्याचा इतका…!”

दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या या विधानावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ही आपली संस्कृती नसल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सुप्रिया सुळेंचा आपण अनादर केला नसल्याची सारवासारव खुद्द चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भाजपावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

“…तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या”

दिपाली सय्यद यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये बोलताना “मोदींनी मसणात जा. शाहांनी मसणात जा. महागाई आटोक्यात आणता येत नसेल, तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या”, अशा शब्दांत दिपाली सय्यद यांनी निशाणा साधला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena dipali sayyed slams chandrakant patil supriya sule statement pmw

Next Story
यवतमाळ : “बोंडअळीमुळे कापसाचे मोठे नुकसान, नैराश्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या”, भाजपाची उपाययोजनांची मागणी
फोटो गॅलरी