सावंतवाडी : ​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या चारही ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी १९ उमेदवार आणि ७७ नगरसेवक पदासाठी ३०८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

​महायुती आणि महाविकास आघाडीत मतभेद:

​या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुती फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे, तर महा विकास आघाडीमध्येही एकवाक्यता नसल्याचे चित्र समोर आले आहे. ​सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत.

​उबाठा शिवसेना: सीमा मठकर

​भाजप: श्रद्धा सावंत भोसले

​शिंदे शिवसेना: ॲड. नीता कविटकर सावंत

​काँग्रेस: सौ. साक्षी वंजारी

​अपक्ष: सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, निशाद बुराण रिंगणात आहेत.​यासोबतच, २० नगरसेवक पदांसाठी ९४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

वेंगुर्ले नगरपरिषद: सहा उमेदवार रिंगणात:

​वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार तर २० नगरसेवक पदासाठी ८९ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदाचे प्रमुख उमेदवार:

​भाजप: दिलीप गिरप

​काँग्रेस: विलास गावडे

​शिंदे शिवसेना: नागेश गावडे

​ठाकरे शिवसेना: संदेश निकम

​अपक्ष: नंदन वेंगुर्लेकर, सोमनाथ टोमके रिंगणात आहेत.

​मालवण नगरपरिषद:

​मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.

​भाजप: शिल्पा खोत

​उबाठा शिवसेना: पूजा करलकर

​शिंदे शिवसेना: ममता वराडकर

​येथे २० नगरसेवक पदांसाठी ७६ उमेदवार रिंगणात आहेत.

​कणकवली नगरपंचायत: चार प्रमुख उमेदवार:

​कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवक पदासाठी निवडणूक होत आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार:

​भाजप: समीर नलावडे

​शहर विकास आघाडी: संदेश पारकर

​लोकशक्ती: गणेशप्रसाद पारकर

​अपक्ष: सौरभ पारकर रिंगणात आहेत.

​१७ नगरसेवक जागांसाठी ४९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

भाजप आणि ​शिवसेना (शिंदे गट) युतीची चर्चा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरोधात ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना, काँग्रेस एकत्र येऊन शहर विकास आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत, त्यामुळे कणकवली नगरपंचायत निवडणुकीत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.