राष्ट्रवादी पक्षाने महाराष्ट्र तसेच देशभरात दौरे केले तरी त्यांचे ५० पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत, असा दावा शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील यांनी केला होता. त्यांच्या याच दाव्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावर टीका करत असतील तर करू द्या. आमचं नाणं खणखणीत आहे, त्यामुळेच आमच्यावर टीका होते. विरोधकही दिलदार असला पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या बारामतीमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंनी आमंत्रण दिल्यास दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का? नारायण राणेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

शहाजी बापू पाटील यांचे ते मत आहे. त्यांना तसे वाटत असेल तर काहीही हरकत नाही. विरोधकही दिलदार असायला हवा. ते आमच्यावर रोजच टीका करत असतात. ही चांगलीच बाब आहे. आपण आंब्याच्याच झाडाला दगड मारत असतो. बाभळीला कोणी दगड मारत असतो. आपलंच नाणं खणखणीत आहे, म्हणून जो उठतोय तो आमच्याच विरोधात बोलत आहे, असे सुप्रिया म्हणाल्या.

हेही वाचा >>> अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणाला?, शरद पवारांनी दोन वाक्यात विषयच संपवला; म्हणाले…

याआधीही शरद पवार विरोधात असतात तेव्हा महाराष्ट्राचा दौरा करतात. दौरा करून आले की ते पुन्हा सत्तेत येतात, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावरही विरोधकांनी टीका केली होती. आता तो काळा गेला. शरद पवार यांनी काम केले, हे सर्वांनाच मान्य आहे. मात्र त्यांच्या नावाचा किती दिवस वापर करणार? असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता

हेही वाचा >>>. “आता मिटवायचं काय राहिलं?” गिरिश महाजनांच्या ‘मिटवून टाकू’च्या दाव्यानंतर एकनाथ खडसेंचे स्पष्टीकरण, म्हणाले…

शहाजी पाटील काय म्हणाले होते?

शरद पवार यांनी एस काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. तेव्हा त्यांचे ५० च्या आतच आमदार होते. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आहे तरीदेखील त्यांचे आमदार ५० च्या आतच आहेत. राष्ट्रवादी पक्षाने आतापर्यंत तीन-चार निवडणुका लढल्या आहेत. मात्र या पक्षाचे ५० पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले नाहीत. आर आर पाटील प्रदेशाध्यक्ष असताना ५५-६० आमदार निवडून आले होते. ती आर आर आबा यांची कला होती. त्यामुळे राष्ट्रवादी महाराष्ट्र आणि देशभर फिरली तरी त्यांचे ५० पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत, असे शहाजी पाटील म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule comment over shahajibapu patil criticism on sharad pawar ncp prd
First published on: 03-10-2022 at 19:33 IST