"बाळासाहेब ठाकरेंना किती..," न्यायालयाच्या निकालानंतर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, शरद पवार यांचाही दिला दाखला | supriya sule comment supreme court verdict on eknath shinde uddhav thackeray clash on shivsena remember balasaheb thackeray | Loksatta

“बाळासाहेब ठाकरेंना किती..,” न्यायालयाच्या निकालानंतर सुप्रिया सुळेंचे विधान, शरद पवार यांचाही दिला दाखला

शिवसेना पक्षातील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन गटांतील वादासंदर्भात सर्वोच न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

“बाळासाहेब ठाकरेंना किती..,” न्यायालयाच्या निकालानंतर सुप्रिया सुळेंचे विधान, शरद पवार यांचाही दिला दाखला
सुप्रिया सुळे, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे

शिवसेना पक्षातील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन गटांतील वादासंदर्भात सर्वोच न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाचे हे ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने या संदर्भातील उद्धव ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली आहे. शिंदे गटाने न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर यापुढे शिवसेना पक्ष कोणाचा आणि या पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबतची लढाई उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगातच लढावी लागणार. दरम्यान, एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सुरू असलेली न्यायालयीन लढाई खूप दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरे यांना किती वेदना होत असतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. ‘एबीपी माझा’ने याबाबत सवित्तर वृत्त दिले आहे.

हेही वाचा >> “…हे तर त्यांना मिळालले उत्तर!” शिंदे-ठाकरे गटातील वादावरील न्यायालयाच्या निर्णयानंतर दीपक केसरकरांचे विधान

हे खूप दुर्दैवी आहे. आता वैचारिक लढाई संपलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सगळेच ओरबाडून घेतले जात आहे. बाळासाहेब आणि माँसाहेबांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग म्हणजे त्यांची मुलं आणि नातवंडे आहेत. बाळासाहेबांच्या मुलावरच हल्ला केला जात आहे. हे संयुक्तिक नाही. हे माझ्या मनाला न पटण्यासारखं आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा >> शिंदे गट-उद्धव ठाकरेंच्या वादावरील निकालावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रया, जयंत पाटील म्हणाले…

तुमच्यात मतभेद असतील तर वेगळं घर करायला हवं. तुम्हाला शुभेच्छा असतील. पण ओरबाडून घेतले जात असून ठाकरे कुटुंबावर नको ते आरोप केले जात आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरत आहेत. मात्र त्यांना बाळासाहेबांची मुलं आणि नातवंडं चालत नाहीत. हे खूप दुर्दैवी असून आपल्या महाराष्ट्राला न शोभणारे आहे, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा >> शिंदे गट-उद्धव ठाकरे वादावरील निकालानंतर अमृता फडणवीसांचे महत्त्वाचे विधान, म्हणाल्या…

शरद पवार यांच्याविरोधात जेव्हा काँग्रेसने कारवाई केली होती, तेव्हा त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला होता. विचार एक असेल तर आपले वेगळे घर करावे. वैचारिक लढाई असेल, तर काहीही हरकत नाही. या भांडणामुळे, कोर्टाच्या लढाईमुळे बाळासाहेब ठाकरेंना किती वेदना होत असतील, असेदेखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शिंदे सरकारचा नवरात्रोत्सवानिमित्त महत्त्वाचा निर्णय; १ ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत मिळणार ‘ही’ विशेष सूट

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाले “जर उद्या…”
बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन, म्हणाले…
“कन्नड रक्षण वेदिकेला काँग्रेसची फूस”, भाजपाचा गंभीर आरोप; म्हणाले, “महाराष्ट्र काँग्रेसचे नेते…”
कुराण, इस्लामचा संदर्भ देत सुषमा अंधारेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल, म्हणाल्या “जर हिंदू असतील तर…”
“पुढील २४ तासांमध्ये हे प्रकार थांबले नाहीत तर…”; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन झालेल्या हल्ल्यांवरुन पवारांचा थेट इशारा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“गुजरात, सोलापूर, जतच्या सीमेवर जे झालं, या गोष्टी एकदम आताच का आल्या?” ; शरद पवारांचा सवाल!
Video: नवरा पॉर्न मूव्ही काढतो आणि ही उर्फीची… विचित्र जीन्समुळे शिल्पा शेट्टी झाली तुफान ट्रोल
पुणे : मनसे अंतर्गत गटबाजी उफाळली; वसंत मोरेंच्या आरोपानंतर पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक
महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावात हल्ला: अजित पवार संतापून म्हणाले, “‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने…”
उर्वशी रौतेलाच्या घरी लगीनघाई, अभिनेत्री रंगली हळदीच्या रंगात