पंतप्रधान मोदींची मुलाखत अक्षय कुमार घेतात आणि मुख्यमंत्र्यांची मुलाखत नाना पाटेकर घेतात, मग पत्रकार काय खुळली आहेत का? अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी भाजपा-शिंदे गटावर केली. उस्मानाबादमध्ये आयोजित शिवसेनेच्या ‘महाप्रबोधन यात्रे’त त्या बोलता होत्या. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “मनुवादी अस्त्रांपासून सावध राहा” सुषमा अंधारेंचं विरोधकांवर टीकास्र!

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“ज्या लोकांनी भ्रम तयार केला, ज्यांनी अफवा परसवल्या की उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडत नाहीत. त्यातल्या एकाही शहाण्याने, एकाही विद्वानाने भाजपा आणि मोदींजीना प्रश्नविचारला नाही की, मोदीजी तुम्ही एकही पत्रकार परिषद आजपर्यंत का घेतली नाही. एकाही पत्रकार परिषदेला मोदीजी सामोरे जात नाहीत? मुळात त्यांच्या पत्रकार परिषद नाहीत, तर मुलाखती होतात आणि मुलाखत घेतं कोण? पंतप्रधान मोदींची मुलाखत अक्षय कुमार घेतात आणि मुख्यमंत्र्यांची मुलाखत नाना पाटेकर घेतात, मग पत्रकार काय खुळली आहेत का? पत्रकारांनी मुलाखती नाही घ्यायच्या का?” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

हेही वाचा – “ज्यांनी महापरिनिर्वाण दिनाला कधी बॅनर लावले नाहीत, ते…”; वंचित-ठाकरे गट बैठकीवरून दिपक केसरकरांची खोचक टीका

“ज्यावेळी तुम्ही म्हणता की उद्धव ठाकरेंनी काय केलं? त्यावेळी खुल्या पत्रकार परिषदेत उभं राहून बोलायची तुमची हिंमत आहे का? आम्ही ठामपणे उभं राहू शकतो, बोलू शकतो, सांगू शकतो की आम्ही काय काम केलं. खरं तर आम्ही काय काम केलं, हे आम्ही सांगायची गरज नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितलं आहे, की जगभरातला उत्तम पॅटर्न कुठला होता, तर तो धारावी पॅटर्न होता. जगातलं सर्वात चांगलं काम कुठं झालं असेल, तर ते मुंबई महापालिकेत झालं, पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेंच नाव होतं”, असेही त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare criticized bjp and pm narendra modi in shivsena mahaprabodhan yaytra spb