संगमनेर : शहरात धुमधडाक्यात वराह जयंती साजरी करण्यात आली. भगवान वराह यांचे विचार आणि आचार तरुण पिढीने आचरणात आणून मार्गक्रमण करावे, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी जयंतीच्या निमित्ताने केले.

शहरातील रस्त्यावर सकल हिंदू समाज आणि वराह प्रतिष्ठानच्या वतीने वराह जयंती आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार खताळ बोलत होते. भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, रेखा गलांडे, प्रकाश पवार, साजन कतारी, महेश बागडे, योगेश दुसाने, रणजित शिंदे, शंकर पवार, अक्षय धुमाळ, शेटीबा पवार, कपिल पवार यांच्यासह सकल हिंदू समाज आणि वराह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार खताळ म्हणाले, हिंदू धर्मात वराह जयंतीला महत्त्व आहे. धर्माचे रक्षण आणि अधर्माचा नाश हा विष्णूंच्या प्रत्येक अवताराचा उद्देश होता. अन्याय, अत्याचार, अधर्म कितीही बलाढ्य असले तरी शेवटी सत्याचा व धर्माचाच विजय होतो हे आपल्याला त्यातून शिकायला मिळते. भारतीय पुराणांमध्ये भूमीला माता मानले आहे. वराह अवतार हा मातृभूमीच्या रक्षणाचा संदेश देतो. भ्रष्टाचार, अन्याय, हिंसा या रूपातील आधुनिक राक्षसांना पराभूत करण्यासाठी समाजात धर्म, सत्य, सदाचार यांचा अवलंब करणे आवश्यक आहे. भूमातेच्या रक्षणासाठी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

वाद्यांच्या निनादात मिरवणूक

संगमनेर शहरात प्रथमच वराह जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त आमदार खताळ यांच्या हस्ते मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत ढोल ताशा, सनई चौघडा, आवाजाच्या भिंतींचा दणदणाट होता. ही मिरवणूक बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अशोक चौक, चावडी, मेन रोड, सय्यद बाबा चौक, तेली खुंट, नेहरू चौक मार्गे चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी भगवान वराह स्वामींची प्रतिमा होती.

शहरातील रस्त्यावर सकल हिंदू समाज आणि वराह प्रतिष्ठानच्या वतीने वराह जयंती आयोजित करण्यात आली होती. भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, रेखा गलांडे, प्रकाश पवार, साजन कतारी, महेश बागडे, योगेश दुसाने, रणजित शिंदे, शंकर पवार, अक्षय धुमाळ, शेटीबा पवार, कपिल पवार यांच्यासह सकल हिंदू समाज आणि वराह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.