X

फोटोग्राफर्सनी सांगितलं आणि गरोदर असतानाही गीता बसराने केलं…नेटिझन्स भडकले!

अभिनेत्री गीता बसरा क्रिकेटपटू हरभजन सिंगची पत्नी आहे

अभिनेत्री गीता बसरा आणि भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी गेल्याच महिन्यात आपण दुसऱ्यांदा आई बाबा होणार असल्याची बातमी शेअर केली होती. या बातमीने त्यांचे चाहतेही खूश झाले होते. हरभजन आणि गीताने आपले फॅमिली फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली होती. गीताचे नुकतेच काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामुळे नेटिझन्स चांगलेच भडकले आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने इन्स्टाग्रामवर गीता बसराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात आजूबाजूचे फोटोग्राफर्स तिला मास्क काढायला सांगत आहे. यानंतर तिने मास्क काढत फोटोसाठी पोझही दिली आहे. मात्र तिच्या चाहत्यांना ही गोष्ट अजिबात आवडलेली दिसत नाही. ती मुंबईतल्या एका क्लिनिकमध्ये जातानाचा हा व्हिडिओ आहे.

करोनाच्या गंभीर परिस्थितीत आणि गरोदर असताना गीताला मास्क काढून पोझ द्यायला सांगितल्याबद्दल नेटिझन्स फोटोग्राफर्सवरही भडकले आहेत. एक युजर म्हणतो, “तुम्ही सारखं मास्क का काढायला सांगता…हे खूप बेजबाबदारपणाचं आहे.” तर जे मास्क काढायला लावतात त्यांना दंड करायला हवा असं मतही एका युजरने व्यक्त केलं आहे. ती गरोदर असतानाही तुम्ही तिला एवढी मोठी रिस्क कशी घ्यायला सांगत आहात याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

गीताने हरभजन सिंगसोबतचे फोटो शेअर करत आपण जुलै २०२१मध्ये पुन्हा आईवडील होणार असल्याची बातमी दिली होती. गीता आणि हरभजनच्या या फोटोंमध्ये गीता आपल्या बेबी बम्पसह दिसून आली. या फोटोंमध्ये त्यांची मुलगीही दिसत होती. तिने मी लवकरच मोठी बहीण होणार आहे अशा आशयाचा मजकूर असलेला टीशर्टही हातात धरलेला होता.

२९ ऑक्टोबर २०१५ रोजी हरभजन सिंग आणि गीता बसरा लग्नबंधनात अडकले. या लग्नात क्रिकेटविश्वासोबतच अनेक ब़ॉलिवूड सेलिब्रिटी तसंच राजकीय क्षेत्रातले लोकही उपस्थित होते.

24
READ IN APP
X