Advertisement

Raj Kundra Troll: कोर्टात हजेरी लावण्याआधी राज कुंद्राने केला असा इशारा; सोशल मीडियावर होतोय ट्रोल

राज कुंद्राचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये त्याचे इशारे पाहून सोशल मीडियावर तो प्रचंड ट्रोल होतोय.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १९ जुलै रोजी त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. शुक्रवारी २३ जुलै रोजी राजला भायखळा कारागृहातून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयात हजर करण्यापूर्वीचे राज कुंद्राचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये त्याचे इशारे पाहून सोशल मीडियावर त्याचा प्रचंड ट्रोल करण्यात येतंय.

राज कुंद्राला जेव्हा भायखळा कारागृहातून न्यायालयात हजर करण्यासाठी नेलं जातं होत त्यावेळी सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी राजचे काही फोटोज क्लिक केले. यावेळी राज कुंद्रा एकदम शांत दिसून आला. पण फोटो क्लिक करत असताना तो विक्ट्री साइन दाखवत हात जोडताना दिसून आला. त्याचे हे इशारे करतानाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरू लागले. हे फोटो पाहून नेटकरी मंडळी राज कुंद्रावर खूपच भडकले आहेत. सोशल मीडियावर राज कुंद्राला प्रचंड ट्रोल करण्यात येतंय. या फोटोंमध्ये राज कुंद्रा विक्ट्री साइन करताना आणि हात जोडताना तो अशा स्टाइलमध्ये वावरताना दिसून आला, जसं की त्याने एखादं खूप मोठं काम करून जिंकून आलाय.

युजर्स म्हणाले, “निर्लज्ज”

राज कुंद्राच्या या हावभावामुळे सोशल मीडियावर त्याला युजर्स ‘निर्लज्ज’ म्हणताना दिसून येत आहेत. ‘फॉल ऑफ शेम’, ‘नमस्कार तर पहा कसा करतोय…गर्वाचं काम केलंय ना याने..’, ‘आजची ही विक्ट्री साइन नाही, घमंडची साइन आहे…कर्म हिशोब ठेवतो’, यासारख्या अनेक कमेंट्स राज कुंद्राच्या या फोटोवर दिसून येत आहेत.

राज कुंद्राच्या घरी टाकला छापा

मुंबई पोलिसांनी याचसंदर्भात राज यांची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला. यावेळी पोलिसांना घरात एक गुप्त कपाट सापडल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विआन आणि जे.एल. स्ट्रीम कंपनीच्या कार्यालयात एक लपवलेलं कपाट सापडलं आहे. तसंच त्यांच्या घरात इलेक्ट्रॉनिक गॅझेट आढळून आली, ती जप्त करण्यात आली आहेत. पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा ऑनलाइन बेटिंगमध्ये वापरण्यात आल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती.

21
READ IN APP
X
X