A r rahman expressed his views about recreation of songs rnv 99 | "एखाद्या गाण्याचे रिमिक्स करणारे तुम्ही कोण?", ए. आर. रहमान संतापले | Loksatta

“एखाद्या गाण्याचे रिमिक्स करणारे तुम्ही कोण?”, ए. आर. रहमान संतापले

एका मुलाखतीत ए आर रहमानने सांगितलं, “रिमिक्सच्या नावाखाली संगीताची हानी होते आहे…”

“एखाद्या गाण्याचे रिमिक्स करणारे तुम्ही कोण?”, ए. आर. रहमान संतापले

गेल्या काही वर्षात अनेक जुन्या गाण्यांना नव्याने तयार करण्यात आले. तरुण पिढीला आवडेल असे संगीत देऊन ती गाणी वेगळया अंदाजात प्रेक्षकांसमोर येतात. त्यातली काही गाणी हिट होतात तर काही गाण्यांचे हे नवीन व्हर्जन प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नाही. गेले काही दिवस नेहा कक्करच्या ‘ओ सजना’ या गाण्यावरून बराच वाद चालला आहे. हे गाणे म्हणजे ‘मैने पायल है छनकाई’ या गाण्याचे नवे व्हर्जन आहे. या गाण्याची मूळ गायिका फाल्गुनी पाठक हिने या नव्या गाण्यावर आक्षेप घेतला असून त्यांच्यात वाद सुरु आहेत. अशात अनेक कलाकार यावर आपली मतं मांडत आहेत. यात सुप्रसिद्ध गायक ए आर रहमान यांनीही आपले मत मांडले आहे.

आणखी वाचा : रश्मिका मंदानाने केली फॅनची ‘ही’ विचित्र मागणी पूर्ण, व्हिडिओ झाला व्हायरल

एका मुलाखतीत ए आर रहमानने सांगितलं, “रिमिक्सच्या नावाखाली संगीताची हानी होते आहे. त्यातून जे कानावर येते ते ऐकावेसेही वाटत नाही.” त्यासोबत नेहा कक्करचे बॉलिवूडमधील जे रिमिक्स कल्चर आहे त्याविषयीही त्याने नाराजी व्यक्त केली आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत नेहाचे नाव न घेता तिच्यावर टीका केली आहे. तो म्हणाला, “एखाद्या गाण्याचे रिमिक्स केल्यावर त्याच्या मूळ गाण्यालाही धक्का पोहोचतो. तसेच त्या मूळ संगीत दिग्दर्शकाच्या भावांनाही धक्का लागतो. मला अनेकजण विचारतात की तुम्ही एखादं जुनं गाणं नव्याने तयार करणार का? एखाद्या गाण्याचे रिमिक्स करणारे तुम्ही कोण? मी माझ्या कामाबरोबरच दुसऱ्याच्या कामाचीही काळजी घेत असतो. काम करताना तुम्ही समोरच्याचा कामाचा आदर ठेवला पाहिजे.”

हेही वाचा : ऐश्वर्या राय, ए आर रहमान, शोभिता धूलिपाला यांचा इकॉनॉमी क्लासने प्रवास, फोटो व्हायरल

दरम्यान, ए आर रहमानचा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा ए आर रहमान यांनी सांभाळली आहे. ३० सप्टेंबरला या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, मळ्यालम आणि तेलगू भाषेत रिलिज होणार आहे. या मल्टीस्टारर सिनेमामध्ये विक्रम बाबू, ऐश्वर्या राय, शोभिता धूलिपाला, प्रकाश राज, रवि, तृषा आणि शरद कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“मुलाचं नाव राम ठेवणार नाही…” सैफ अली खानचा जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकरी संतापले

संबंधित बातम्या

“सतत एकेरी उल्लेख करतोय कारण…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षे यांचं ट्वीट चर्चेत
विक्रम गोखले यांच्या निधनानंतर नटसम्राट मधील ‘तो’ सीन होतोय Viral; जेव्हा प्रेक्षक ढसाढसा रडले पण…
‘अ‍ॅव्हेंजर्स’ सीरिजच्या निर्मात्याबरोबर राजामौली काम करणार? म्हणाले “मला हॉलिवूडमध्ये…”
विक्रम गोखलेंच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रतिक्रिया म्हणाले, “अभिनयाची संस्था…”
“एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Smartphone Tips and Tricks: तुम्हालाही स्मार्टफोनमध्ये खाजगी फोटो, व्हिडीओ लपवायचे आहे? ‘या’ सोप्या पद्धतीने तयार करा ‘हिडन फोल्डर’
FIFA World Cup 2022; इंग्लंड-वेल्सचे चाहते एकमेकांसोबत भिडले; खुर्च्या आणि लाथांनी केली मारहाण, पाहा व्हिडिओ
“मन भरलं म्हणून…” घटस्फोटाच्या चर्चांवरुन ट्रोल करणाऱ्यांना मानसी नाईकचे सडेतोड उत्तर
Viral Video: चक्क चालत चालत त्याने पार्क केला ट्रक; व्हिडीओ पाहून नेटकरी पडले बुचकळ्यात
पुणे: कांदा, टोमॅटो, फ्लाॅवर, कोबी, घेवड्याच्या दरात घट