According to netizens bobby deol is a perfect replacement for jasprit bumrah rnv 99 | जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर, चर्चा मात्र बॉबी देओलची? जाणून घ्या कारण | Loksatta

जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर, चर्चा मात्र बॉबी देओलची? जाणून घ्या कारण

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यामुळे टी२० विश्वचषकातून बाहेर पडावं लागलं आहे.

जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर, चर्चा मात्र बॉबी देओलची? जाणून घ्या कारण

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यामुळे टी२० विश्वचषकातून बाहेर पडावं लागलं आहे. पाठीच्या समस्येमुळे त्याला जवळपास चार ते सहा महिने विश्रांतीसाठी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे यंदाचा टी२० विश्वचषक खेळण्यासाठी त्याला मैदानात उतरता येणार नाही. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयने शुक्रवारी केली. मात्र त्यापूर्वी सोशल मीडियावर जसप्रीत बूमराहच्या जागी कोण येणार यावरून नेटकऱ्यांमध्ये खूप चर्चा रंगली होती.

आणखी वाचा : ‘हर हर महादेव’ चित्रपटात अभिनेता शरद केळकर साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका ?

यादरम्यान अभिनेता बॉबी देओल चांगलाच ट्रेंडमध्ये आला होता. याचे एकमेव कारण म्हणजे त्याचा एक व्हायरल व्हिडिओ. बुमराह टी२० विश्वचषक खेळू शकणार नसल्याची बातमी समोर येताच बॉबी देओलचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तुफान व्हायरल झाला. हा व्हिडिओ एका क्रिकेट सामन्यादरम्यानचा आहे. यात बॉबी गोलंदाजी करताना दिसतोय. व्हिडिओत ज्या प्रकारे बॉबी गोलंदाजी करतोय ते पाहून त्याच्या स्टाईलची तुलना जसप्रीत बुमराहशी केली गेली.

हेही वाचा : अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचे ‘ते’ गाणे अखेर आज १७ वर्षांनी झाले प्रदर्शित

बॉबी देओलचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी क्रिकेट लीगमधील आहे. त्यावेळी चाहत्यांमध्ये बॉबीच्या गोलंदाजीची मोठी चर्चा झाली होती. अनेकांनी त्याला जसप्रीत बुमराहच म्हटलं होतं. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी बॉबीचा हा व्हिडिओ शेअर करत बुमराहच्या जागी बॉबी देओलला टी२० विश्वचषकामध्ये घ्यायला हवं अशी चर्चा सुरू केली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Vikram Vedha Movie Review : रिमेक असूनही उत्तम अभिनयाची जोड असलेला ‘विक्रम वेधा’

संबंधित बातम्या

नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
“मी खरा आहे कारण…” मानसी नाईकच्या नवऱ्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
“आपण जे बघतो त्यावर…” मानसी नाईकच्या गंभीर आरोपांवर पतीचे सडेतोड उत्तर
“नाझी आणि हिटलरबद्दल मला प्रेम वाटतं कारण…” कान्ये वेस्टचे वादग्रस्त वक्तव्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या
“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही
‘जत तालुक्यातील ६५ गावांसाठी विस्तारीत म्हैसाळ सिंचन योजना दीड वर्षात पूर्ण करणार’; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन