scorecardresearch

अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचे ‘ते’ गाणे अखेर आज १७ वर्षांनी झाले प्रदर्शित

बॉलिवूडमधील मोठ्या पडद्यावर प्रचंड गाजलेल्या जोड्यांपैकी एक जोडी आहे ती अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची.

अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचे ‘ते’ गाणे अखेर आज १७ वर्षांनी झाले प्रदर्शित

बॉलिवूडमधील मोठ्या पडद्यावर प्रचंड गाजलेल्या जोड्यांपैकी एक जोडी आहे ती अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची. परंतु काही कारणास्तव ही जोडी अल्प काळानंतर तुटली. त्यानंतर ऑनस्क्रीन ते आपल्याला फारसे एकत्र दिसले नाहीत. काही मतभेदांमुळे असे झाले असल्याचे बोलले जाते. पण अक्षय आणि प्रियांका यांनी मिळून प्रेक्षकांना भुरळ घातली. २००५ साली प्रदर्शित झालेल्या सुनील दर्शन दिग्दर्शित ‘बरसात’ या चित्रपटातून प्रियांकाने आपली छाप प्रेक्षकांवर पाडली. या चित्रपटातील एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

हेही वाचा : ‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी पंकज त्रिपाठी नव्हते अनुराग कश्यपची पहिली पसंती, जाणून घ्या कसे बदलले नशीब

या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिका साकारणार होता पण नंतर त्याच्या जागी बॉबी देओलला कास्ट करण्यात आले. या चित्रपटातील एक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चित्रपटा बॉबी देओलची एंट्री होण्याआधी अक्षय आणि प्रियांकावर हे गाणे चित्रित करण्यात आले होते. अखेर आज, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या १७ वर्षांनतर या चित्रपटातील ‘वो पहली बरसात’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा रोमान्स करताना दिसत आहेत. २००५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील या गाण्याने अक्षय आणि प्रियांका यांची जोडी एक उत्कृष्ट ऑनस्क्रीन जोडी होती, याची आठवण प्रेक्षकांना करून दिली आहे.

हे पावसावर आधारित गाणे आहे. समीर यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून या गाण्याला नदीम श्रवण यांनी सांगीतिबद्ध केलं आहे. तर हे गाणे कुमार सानू आणि अल्का याज्ञिक यांनी गायले आहे. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अक्षय आणि प्रियांका यांचे चाहते पुन्हा एकदा त्यांना एकत्र स्क्रीन शेअर करताना बघू इच्छितात असे कमेंट्स करत सांगत आहेत.

आणखी वाचा : अक्षय कुमारचा ‘कठपुतली’ चित्रपट १८० कोटींना विकला गेला ? ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’शी झाला व्यवहार

‘बरसात’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील दर्शन यांनी केले असून बॉबी देओल, प्रियांका चोप्रा, शक्ती कपूर सुप्रिया पिळगावकर, बिपाशा बासु, विवेक वास्वानी, फरीदा जलाल, बीना बॅनर्जी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar and priyanka chopra starrer old song from the movie barsaat finally got released after 17 years rnv