आजूबाजूला सत्ताकारण आणि समाजकारण ढवळून निघत असताना चेहऱ्याला रंग लावून कॅमेऱ्यासमोर नेहमीप्रमाणे आपले संवाद म्हणायचे आणि चित्रीकरण संपल्यावर घरी निघून जायचं, असा नित्याचा कोरडाच कार्यक्रम करणे कलाकारांनाही भलतेच अवघड जात असावे. राज्यात निवडणुका होण्याआधीच इतक्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत की त्याच्या परिणामस्वरूप हाती काय लागणार आहे? सत्ताबदल, आघाडय़ांच्या समीकरणापासून मुक्ती की आणखीन वेगळे काही.. उत्तर काही तासांत आपल्यासमोर असणार आहे. त्यासाठी आजचा रविवारचा दिवस खास नोकरदार वर्गाने जसा दूरचित्रवाणी संचासमोर बसून काढायचा बेत केला आहे, तसंच कलाकारांनीही केलं आहे का? त्यांनाही निकालाची तेवढीच उत्सुकता आहे का? घडय़ाळाच्या काटय़ाबरोबर मतमोजणीचे आकडे बाहेर पडत राहतील, डोक्यातली विचारांची टिक टिक जेव्हा वाढत जाईल तेव्हा कलाकार मंडळी काय करणार आहेत..
मतदान आणि निकालाच्या तारखेची डायरीत नोंद
लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक जाहीर झाली की, मी माझ्या डायरीत पहिल्यांदा मतदान आणि
अतुल कुलकर्णी
चित्रीकरणात असलो तरी बातम्यांमधून माहिती मिळवणार
सध्या चित्रीकरणामध्ये खूप व्यग्र असल्याने मला निवडणुकांच्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक बाबींची पुरेशी माहिती नाही; पण एकूणच भाजप आणि मोदींची जादू दिसून येते आहे. मला स्वत:ला एका पक्षाच्या हाती एकहाती सत्ता यावी असे वाटते. कारण गेल्या काही वर्षांमध्ये युतींमुळे एकूणच मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास फारसे
सुमित राघवन
निकालाची उत्सुकता असतेच
सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच मलाही निवडणूक निकालाची उत्सुकता असते. फक्त मी मतमोजणीच्या
दिलीप प्रभावळकर
घरच्यांकडून मतमोजणीच्या घडामोडींची माहिती घेत राहणार
या वेळच्या निवडणुकांच्या संदर्भात सांगायचं झाल्यास मी खूपच उत्सुक आहे. कारण पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणामध्ये मतदान केले जात आहे आणि त्यामुळे सत्तापरिवर्तनाची चिन्हेही दिसून येत आहेत.
निर्मिती सावंत
चित्रीकरणाला सुट्टी मिळाली तर संपूर्ण दिवस निकाल पाहण्यात घालवणार
मतदान आवर्जून केले पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळे एकू णच लोकसंख्येचा विचार करता निवडणूक
संजय मोने
थेट निकालच जाणून घेणार
निवडणुकांच्या निकालाबाबत मला उत्सुकता आहेच. यंदाच्या निवडणूकोत्तर सर्वेक्षणांवरूनही नक्की चित्र
मिलिंद गुणाजी
दहावीच्या निकालांइतकीच उत्सुकता
कामानिमित्त कुठेही असलो तरी मतदानाला नेहमी उपस्थित राहणाऱ्यांपैकी मी एक आहे. आपल्याला दहावीच्या निकालाची जितकी उत्सुकता लागून राहिलेली असते, तितकीच उत्सुकता मला यंदाच्या
कुशल बद्रिके
(संकलन – शेखर जोशी, मृणाल भगत)