२०१३ साली प्रदर्शित झालेल्या संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाने अनेक विक्रम मोडत एक नवा इतिहास रचला होता. या चित्रपटाने मराठी मनोरंजन सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. आता संजय जाधव यांनी नुकतीच ‘दुनियादारी २’ या चित्रपटाची घोषणा केली. अभिनेता अंकुश चौधरीने यात ‘दिग्या’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. ‘दगडी चाळ २’ च्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हे कलाकार उपस्थित होते. या मुलाखतीदरम्यान अंकुशला “‘दुनियादारी २’मध्येही तू आम्हाला पुन्हा एकदा ‘दिग्या’च्या भूमिकेत दिसणार का?”, असा प्रश्न विचारण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर दिसणार वेगळ्या माध्यमात, साकारणार नवी भूमिका

‘दुनियादारी’ला ९ वर्षे होऊन गेली असली तरी अंकुशचं अजूनही या भूमिकेबद्दल कौतुक केलं जातं. त्यामुळे आता ‘दुनियादारी २’मध्ये अंकुश पुन्हा त्याच भूमिकेत दिसणार का याकडे प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत. पण आता अंकुशने स्वतः याबद्दल एक मोठी माहिती शेअर केली आहे.

या प्रश्नाचं उत्तर देताना अंकुश म्हणाला, “संजय जाधवने केलेली पोस्ट मी पाहिली आणि लगेचच त्याला ‘दुनियादारी २’साठी शुभेच्छा द्यायला मी फोन केला. त्यावेळी आमच्यात छान बोलणं झालं. संजय दादाने ही पोस्ट शेअर केल्यापासून मला अनेकांचे फोन आणि मेसेजेस येत आहेत. सगळेजण मला विचारात आहेत की, मी ‘दुनियादारी २’ चा भाग असेन का? तर या प्रश्नाचं उत्तर मलाच माहीत नाही. त्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी मला संजय जाधवला फोन करून त्यालाच ते विचारावं लागेल. कारण या चित्रपटात कोण कोण दिसणार हे फक्त त्यालाच माहीत आहे. अजूनतरी त्याच्यात आणि माझ्यात मी या चित्रपटात भूमिका साकारण्याबद्दल बोलणं झालेलं नाही.”

आणखी वाचा : “एखादा हिंदी चित्रपट…”, मराठी चित्रपटाला शो आणि प्राईम टाईम न मिळण्याच्या मुद्द्यावर मकरंद देशपांडे संतापले

दरम्यान, अंकुशचा ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. चंद्रकांत कणसे दिग्दर्शित या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor ankush ahaudhary will once again play the role of digya the actor made a brief disclosure rnv