Dharmendra On Kissing Scene With Shabana Azmi : बॉलीवूडचे ही-मॅन धर्मेंद्र वयाच्या ८९ व्या वर्षीही चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात शबाना आझमी यांना किस करून खळबळ उडवून दिली. त्याच वेळी, ज्येष्ठ अभिनेत्याने अलीकडेच एका मुलाखतीत त्यांच्या या किस सीनबद्दल बोलले आहेत.

धर्मेंद्र शबाना आझमी यांच्याबरोबरच्या किस सीनबद्दल काय म्हणाले?

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत धर्मेंद्र यांनी चित्रपटातील रोमान्सच्या सुंदर सादरीकरणाचे कौतुक केले आणि सांगितले की या दृश्यात खरोखरच भावनिक अर्थ कसे लपलेले आहेत. करण जोहर दिग्दर्शित २०२३ चा हा चित्रपट विनोद आणि प्रेमाचे मजेदार मिश्रण आहे.

चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्टने रॉकी आणि राणीची भूमिका साकारली आहे. कथा त्यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांवर आधारित आहे. ते लग्न करण्यापूर्वी तीन महिने एकमेकांच्या कुटुंबाबरोबर कसे राहायचे यावर आधारित आहे. शबाना आझमींबरोबर किस सीनच्या चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल बोलताना धर्मेंद्र यांनी ते “एस्थेटिक” असे वर्णन केले आणि रोमान्सला वयाची मर्यादा नसते यावर भर दिला.

या ज्येष्ठ अभिनेत्याने त्याचा सहकलाकार रणवीर सिंहबरोबर झालेल्या संभाषणाची आठवण करून दिली. धर्मेंद्र म्हणाले की, मी रणवीरला सांगितले, रणवीर, रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये तू खूप किसिंग सीन केले आहेस. माझ्या एकाच किसने लोकांना आश्चर्यचकित केलं.” ते पुढे म्हणाले, “एक प्रकारे, ते (रॉकी और रानी की प्रेम कहानीमधील धर्मेंद्रचे पात्र) देवदाससारखे होते, देवदास जो दारू पिऊन फिरतो, त्याला काहीही आठवत नाही आणि नंतर तो मरतो… हे दुःखद आहे आणि ती एक चांगली कथा होती.”

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट कुटुंब आणि संस्कृतींमधील कॉम्पलेक्स डायनेमिक्सचे चित्रण करतो. रॉकी हा एका श्रीमंत पंजाबी कुटुंबातील मुक्त उत्साही तरुण आहे. एक महत्त्वाकांक्षी बंगाली न्यूज अँकर राणी, त्यांच्यात खोल मतभेद असूनही प्रेमात पडते. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त, चित्रपटात जया बच्चन, शबाना आझमी, तोता रॉय चौधरी आणि धर्मेंद्र यांच्यासह अनेक उत्कृष्ट सहाय्यक कलाकार आहेत.