मराठीमध्ये सध्या नवनवीन विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे मराठी वेबसीरिज देखील आपलं वेबविश्वामध्ये आपलं स्थान बळकट करू इच्छित आहेत. ‘समांतर’, ‘रानबाजार’, ‘मी पुन्हा येईन’ सारख्या वेबसीरिज मराठीमध्ये चर्चेचा विषय ठरल्या. आता दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर हे नवी कोरी मराठी वेबसीरिज घेऊन येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – तब्बल १५ दिवसांनंतर शुद्धीवर आले राजू श्रीवास्तव, प्रकृतीविषयी नवी माहिती समोर

प्रेक्षकवर्ग आता डिजिटल विश्वाकडे वळला आहे. वेबसीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतो. म्हणूनच की काय महेश मांजरेकर यांनी त्यांच्या नव्या वेबसीरिजची घोषणा केली आहे. ‘एका काळेचे मणी’ असं या वेबसीरिजचं नाव आहे. तसेच महेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या वेबसीरिजचा टीझर शेअर केला आहे.

पाहा टीझर

वेबसीरिजचा टीझर पाहता एका धमाल कुटुंबाची मजेशीर गोष्ट यामध्ये पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय. तसेच या वेबसीरिजला कॉमेडी टच देण्यात आला आहे. या वेबसीरिजच्या टीझरमध्ये मराठीमधील सुप्रसिद्ध चेहरे पाहायला मिळत आहेत. प्रशांत दामले, विशाखा सुभेदार, समीर चौगुले, हृता दुर्गुळे, दत्ता मोरे, वंदना गुप्ते, ईशा केसकर आदी कलाकार यामध्ये काम करताना दिसतील.

आणखी वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’बाबत बोलणं जितेंद्र आव्हाडांना पडलं महागात, ट्वीट करताना चूक झाली अन्…

महेश मांजरेकर यांच्यासह जिओ स्टुडिओनं या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. “आंबट गोड नात्यांची, गोड रुसव्या-फुगव्यांची, आहे ही सुपरकुल गोष्ट. थोडे लव्हली, थोडे इरसाल आहेत मात्र सगळे ‘एका काळेचे मणी…बघा या अतरंगी कुटुंबाची पहिली झलक.” असं महेश यांनी टीझर शेअर करताना म्हटलं आहे. सोशल मीडियाद्वारे या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor director mahesh manjrekar announce new webseries eka kaleche mani see teaser kmd