बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या लाइमलाइटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. काल रात्री कतरिना झोया अख्तरच्या घरी गेली होती. जेव्हा कतरिना कैफ येथून मेकअपशिवाय बाहेर पडताना दिसली, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. कतरिना ओव्हरसाईज आऊटफिटमध्ये दिसली आणि तिच्यासोबत ‘बार बार देखो’ चित्रपटाची दिग्दर्शिका नित्या मेहरादेखील होती.

खरंतर, झोयाच्या घरी झालेल्या एका पार्टीत कतरिनाची पहिली भेट विकी कौशलशी झाली होती, असे सांगितले जाते. काही वेळातच ते बॉलीवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक बनले. त्यांनी त्यांचे नाते अनेक वर्षे लपवून ठेवले. कतरिना झोयाच्या घरी का गेली होती हे माहीत नाही. या नव्या लूकमुळे कतरिना सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून ट्रोल झाली आहे. कतरिनाला पाहून लोकांना ऐश्वर्या रायची आठवण येऊ लागली.

कतरिनाची झलक पाहून लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. एकाने म्हटले, ‘तू आजारी आहेस का? मेकअपशिवाय अशी का फिरते, तीच बोरिंग हेयरस्टाईल, बोरिंग ड्रेस.’ तर एकाने लिहिले, ‘कतरिना आता संस्कारी झाली आहे आणि नेहमीप्रमाणे काहींनी पुन्हा विचारले, कतरिना गर्भवती आहे का? ‘ दुसऱ्याने म्हटले, ‘ही ऐश्वर्या रायसारखी होत आहे. ‘

लग्नाआधी विकी आणि कतरिना यांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणाला कळूदेखील दिलं नाही. ९ डिसेंबर २०२१ मध्ये शाही थाटात विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

“मी तिला पहिल्यांदाच भेटलो होतो… “

विकी कौशलने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्यांची पहिली ऑफिशिअल भेट २०१९ मध्ये झालेल्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये झाली होती. तो म्हणाला होता, “तर मी होस्ट करत होतो, मी तिला पहिल्यांदाच भेटलो आणि तिच्याशी बोललो, ती खूप गोड दिसत होती.”

कतरिना कैफच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची ‘मेरी ख्रिसमस’ या तमिळ चित्रपटात दिसली होती. त्याआधी बॉलीवूडच्या ‘टायगर ३’मध्ये कतरिनाचा अभिनय पाहायला मिळाला होता.