मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री पूजा सावंतच्या नावाचाही समावेश होतो. नुकताच तिचा दगडी चाळ २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पूजाने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. पूजा सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. नुकतीच पूजाने अभिनेत्री अमृता खानविलकरसाठी पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता खानविलकरचा आज वाढदिवस, तिच्या वाढदिवसाला मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसाद ओकनंतर पूजाने शुभेच्छा देण्यासाठी एका व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती अमृता खानविलकरच्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘बाई ग’ या गाण्यावर नृत्य करत आहे. हा व्हिडीओ आज जिचा वाढदिवस आहे तिच्यासाठी पोस्ट करत आहे. या गाण्यात तू तुझा उत्तम परफॉर्मन्स दिला आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा मुली. अशा शब्दात तिने कॅप्शन दिला आहे.

छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहता येणार सासू सुनेची जुगलबंदी; नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पूजाच्या या व्हिडीओवर अमृतानेदेखील कमेंट केली आहे. अमृताने तिचे आभार मानले आहेत. ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील अमृताच्या ‘चंद्रा’ या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं होतं.अमृताच्या वाढदिवसानिमित्त याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो प्रसाद ओकने शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.

‘झलक दिखला जा’या कार्यक्रमामुळे चर्चेत होती मात्र काही दिवसांपूर्वी ती या स्पर्धेतून बाहेर पडली. यानंतर तिने भावूक होत प्रतिक्रिया दिली होती. अमृता गेली अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. तिने मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress pooja sawant dancing on bai song from chandramukhi and wished amurta khanvilkar on her birthday spg