गेल्या एक महिन्यापासून करोना पिडीतांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूदची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढतच चाललीय. सध्या तो करोना पिडीतांसाठी औषधं आणि ऑक्सिजनची जमवाजमव करण्यात व्यस्त आहे. या कठीण काळात अभिनेता सोनू सूद त्याच्याकडून जितकं शक्य होईल तितकी जास्त मदत करण्याचा प्रयत्न करतोय. त्याची ही धडपड पाहून आता त्याने निवडणूक लढवावी, अशी इच्छा एका अभिनेत्याने व्यक्त केलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनाच्या पहिल्या लाटेपासून करोना पिडीतांच्या मदतीला धावणारा अभिनेता सोनू सूद याच्या फॅन फॉलोओर्सच्या यादीत केवळ नेटीझन्स नव्हे तर बॉलिवूड क्षेत्रातील कलाकारांचाही यात समावेश होऊ लागलाय. अभिनेता सोनू सूद याचं काम पाहून त्याने निवडणुकीत उभा रहावा, अशी इच्छा एका अभिनेत्याने व्यक्त केलीय. बॉलिवूड अभिनेता आदित्य सील याने ही इच्छा व्यक्त केली असून “अभिनेता सोनू सूद जर निवडणुकीत उभा राहीला तर माझं मत त्यालाच देईल”, असंही म्हटलंय. सोशल मिडीयावर सक्रीय असलेला अभिनेता आदित्य सीलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केलीय आणि ती सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील होतेय.

Instagram : @adityaseal

अभिनेता आदित्य सीलने या इन्स्टा स्टोरीत लिहीलंय की, “जर पुढे जाऊन अभिनेता सोनू सूद निवडणूकीत उभा राहीला तर माझं मत त्याला नक्कीच मिळेल.”  काही दिवसांपुर्वीच अभिनेता सोनू सूदच्या आणखी एका फॅनने ट्विटरवर अशीच इच्छा व्यक्त करत सोनू सूदला टॅग केलं होतं. “आता तुम्ही राजकारणार या, असंही त्यासाठीचा प्लॅटफॉर्म तर आता तयार झालाच आहे…”, असं या ट्विटमध्ये त्या फॅनने लिहीलं होतं.

यावर अभिनेता सोनू सूदने रिप्लाय देत म्हटलं, “प्लॅटफॉर्मवर राजकारण होतं आणि जमिनीवर राहून काम”. असंही यापुर्वी अनेक इंटरव्ह्यूमध्ये अभिनेता सोनू सूदने राजकारणात येण्यासाठी काहीही इंटरेस्ट नसल्याचं कित्येकदा स्पष्ट केलंय. फक्त लोकांची मदत करायची असल्याचं देखील अनेकदा सोनू सूदने म्हटलंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya seal said if sonu sood stands in the election my vote will go to him only prp