Vijay deverakonda hospitalised due to dengue : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा ‘किंग्डम’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. लाखो हृदयांवर राज्य करणारा अभिनेता विजय देवरकोंडा याच्याबद्दल एक बातमी समोर आली आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच विजय देवरकोंडाला प्रकृतिअस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे विजयला चित्रपटाच्या प्रमोशनल कामांमधून ब्रेक घ्यावा लागला आहे.
विजय देवरकोंडाला झाला डेंग्यू
इंडिया टुडेमधील एका वृत्तानुसार, अभिनेत्याला डेंग्यू झाला आहे. विजयच्या रुग्णालयात राहण्याच्या काळात त्याच्या कुटुंबाने त्याला पाठिंबा दिला आहे. अभिनेता सध्या उपचार घेत असून, तो बरा होत आहे आणि पुढील काही दिवसांत त्याला डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे. ही बातमी सोशल मीडियावरही पसरली आहे. त्याचे चाहते त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करीत आहेत.
‘किंग्डम’ ३१ जुलै रोजी होणार प्रदर्शित
किंग्डमबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट ३१ जुलै रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत विजयच्या रुग्णालयात दाखल होण्याने चाहते खूप नाराज आहेत. वृत्तांनुसार, विजयचे कुटुंब त्याच्याबरोबर रुग्णालयात उपस्थित आहे. विजयला २० जुलैपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.
किंग्डमबद्दल बोलायचे झाले, तर हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट असेल. हा चित्रपट गौतम तिन्नानुरी यांनी दिग्दर्शित केला आहे. वृत्तांनुसार, नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे डिजिटल हक्क ५० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.
‘किंगडम’व्यतिरिक्त, ‘डॉन ३’मध्ये विजयच्या भूमिकेबद्दलही चर्चा आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. जर वृत्तावर विश्वास ठेवला, तर असे म्हटले जात आहे की, विजय या चित्रपटातदेखील दिसू शकतो आणि तो खलनायकाच्या भूमिकेत दिसू शकतो. यापूर्वी एका वृत्तात असे म्हटले होते की, विक्रांत मॅसी खलनायकाची भूमिका साकारणार होता; परंतु नंतर असे म्हटले गेले की, विजयने विक्रांतची जागा घेतली आहे. त्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
विजय शेवटचा दिसला होता ‘या’ चित्रपटात
सध्या लोक ‘किंग्डम’साठी उत्सुक आहेत. हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी खास आहे. कारण विजय बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. तो शेवटचा जून २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटात दिसला होता.