अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण आता एक मोठा ब्रेक घेऊन लवकरच मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियन सेलवन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच ती मुलगी आराध्याला घेऊन चित्रपटाच्या शूटिंग सेटवर पोहोचली होती. यावेळी तिच्या ‘पोन्नियन सेलवन’ चित्रपटाच्या सेटवरील नव्या लूकचा फोटो लीक झालाय. यात तिला लूक एका महाराणीच्या आवतारातला दिसून येतोय. या रॉयल लूकमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसून आली. ऐश्वर्याचा नव्या चित्रपटातला हा महाराणीचा लूक पाहून फॅन्स पुरते घायाळ झाले आहेत.

ऐश्वर्या रायचा लीक झालेल्या या लूकमध्ये तिने रेड आणि गोल्डन कलरची सिल्क कांजीवरम साडी परिधान केलेली आहे. यावर तिने गोल्डन ज्वेलरी परिधान केल्यानं तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसतंय. यात तिने नेकलेस, बांगड्या, मोठ्या आकाराचे कानातले आणि कपाळावर बिंदी असा आकर्षक साज केलाय. या लूकमध्ये ती एक राजघराण्यातल्या महाराणीपेक्षा काही कमी दिसत नाही. या फोटोमध्ये तिने हातात एक पंखा देखील पडकलाय. पंख्याने ती आपल्या चेहऱ्यावर हवा मारताना दिसून येतेय.

या फोटोमध्ये ऐश्वर्याच्या आजुबाजूला चित्रपटाची संपूर्ण टीम दिसून येतेय आणि तिच्या बाजूला एक मोठा बूम ठेवलेला दिसून येतोय. अभिनेत्री ऐश्वर्या रॉय या चित्रपटात नंदिनी आणि तिची आई मंदाकिनी अशी दुहेरी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्याशिवाय विक्रम, कार्थी, त्रिशा कृष्णा, प्रकाश राज, जयराम रवि आणि ऐश्वर्या लक्ष्मी सारखे कलाकार देखील झळकणार आहेत. ऐश्वर्याचा हा चित्रपट १९९५ मध्ये प्रकाशित झालेल्या कल्कि कृष्णमूर्ति यांची कादंबरी ‘पोन्नियन सेलवन’ यावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या कादंबरीत साउथमधील सर्वात पॉवरफुल राजाची कहाणी सांगण्यात आलीय.

अनेक वर्षानंतर मणीरत्नमसोबत करतेय काम

‘पोन्नियन सेलवन’ या चित्रपटाच्या माध्यमातून ऐश्वर्या अनेक वर्षानंतर मणीरत्नम यांच्यासोबत काम करतेय. याआधी तिने ‘रावण’ आणि ‘गुरू’ चित्रपटात त्यांच्यासोबत काम केलंय. या चित्रपटात ए.आर. रेहमान यांनी संगीत दिलंय. सिनेमाटोग्राफर रवि वर्मन हे या चित्रपटाचं शूट करत आहेत. ऐश्वर्या गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये या चित्रपटाचं शूटिंग करण्यासाठी गेली होती. नुकतंच तिकडचं शूटिंग आटोपून ती मुंबईत परतली आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय अखेरला २०१८ साली ‘फेन्ने खां’ चित्रपटात झळकली होती. यात तिच्यासोबत अभिनेते अनिल कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत झळकले होते. पण या चित्रपटाला हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही.

 

प्रेग्नंन्सीबाबत सुरू होती चर्चा

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरूवात झाली होती. ऐश्वर्याला जिथे कुठे स्पॉट करण्यात येतंय, त्या प्रत्येक ठिकाणी तिने परिधान केलेल्या ड्रेसिंग सेन्सवरून ती प्रेग्नंट असल्याचा संशय फॅन्स व्यक्त करताना दिसून आले. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. पण तरीही यावर अद्याप अभिनेत्री ऐश्वर्या राय किंवा तिच्या कुटूंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.