Akshay Kumar Producer Did This Jugaad Instead of Clothes to Save Money : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे आणि आता तो स्वतः निर्माता आहे. अक्षय कुमार अलीकडेच कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिसला, जिथे त्याने त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या एका घटनेचा खुलासा केला
अक्षय कुमार म्हणाला, “मी ‘डान्सर’ नावाचा एक चित्रपट केला होता. ही खूप जुनी गोष्ट आहे. ती कदाचित माझी दुसरी किंवा तिसरी फिल्म होती. मी पांढरा शर्ट आणि निळी जीन्स घालून आलो होतो. दिग्दर्शक म्हणाला, “हा डान्सर आहे ना, म्हणून त्याला पांढरा शर्ट देऊ नका, त्याला ६-७ रंगीत शर्ट आणा.” प्रॉडक्शन स्टाफ म्हणाला, “हो.” दिग्दर्शकाने म्हटले आहे की, त्याला ६-७ रंगीत लाल आणि पिवळे शर्ट पाहिजेत. मला अजूनही आठवते की, निर्मात्या अर्चनाजी उठून कॅमेरामनकडे गेल्या. त्यांनी त्याच्या कानात काहीतरी कुजबुजल्या. मग कॅमेरामनने त्याच्याकडे पाहिले. कॅमेरामन दिग्दर्शकाकडे गेला. तुम्हाला कोणत्या रंगाचा शर्ट हवा आहे? त्याने पिवळा म्हणाला. तेव्हा चार आणेमध्ये जिलेटिन पेपरचा एक खूप मोठा तुकडा येतो. त्याने तो पिवळा कागद सर्व लाईटवर लावला. माझा शर्ट पिवळा होता, माझी पॅन्ट पिवळी होती आणि माझा चेहरा पिवळा झाला होता. माझ्या निर्मात्याने माझ्यासाठी फक्त एका रुपयात चार रंगीत शर्ट बनवले. त्यानं सर्वत्र जिलेटिन पेपर लावले.”
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करीत आहे. अक्षयबरोबर अर्शद वारसी मुख्य भूमिकेत आहे.
सुरुवातीच्या काळात अक्षयने अनेक ॲक्शन चित्रपटांमध्ये काम केले, ज्यामुळे त्याला ‘खिलाडी’ म्हणून ओळख मिळाली. अक्षय कुमारने १९९१ मध्ये ‘सौगंध’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यात त्याच्याबरोबर राखी व शांतीप्रिया या अभिनेत्री मुख्य भूमिकांत होत्या. त्यानंतर अक्षयने ‘खिलाडी’, ‘मैं खिलाडी तू अनारी’, ‘खिलाडीयों का खिलाडी’, ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’, ‘खाकी’, ‘टॉयलेट’, ‘स्पेशल २६’, ‘बेबी’, ‘एअरलिफ्ट’, ‘पॅडमॅन’ व ‘मिशन मंगल’,’OMG’, OMG 2′ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करीत प्रेक्षकांची मनं जिंकली.