बॉलीवूड अभिनेता विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना याने १९९७ मध्ये त्याचे वडील विनोद खन्ना निर्मित ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही, मात्र अक्षयने या त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली होती. मात्र, अक्षय खन्नाला खरी ओळख ‘बॉर्डर’ चित्रपटातील धरमवीरच्या व्यक्तिरेखेतून मिळाली. पण अक्षय खन्ना त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असायचा. त्याच्या अफेअरच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : तुकाराम महाराजांची बायको खरंच खूप कजाग होती का? मुलीचा विचित्र प्रश्न ऐकता किरण माने, म्हणाले…

अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूरच्या लव्ह स्टोरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. असे म्हटले जाते की दोघेही लग्ना बंधनात अडकणार होते, परंतु त्यांच लग्न होऊ शकलं नाही आणि अभिनेता आजपर्यंत अविवाहित आहे. त्याने कधीही लग्न केले नाही. करिश्मा व्यतिरिक्त, त्याचे नाव अभिनेत्री ऐश्वर्या रायशी देखील जोडले गेले होते. दोघांनी ‘आ अब लौट चले’ या चित्रपटात एकत्र काम केले होते आणि त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले.

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

ऐश्वर्या आणि अक्षयचे अफेअर असल्याच्या केवळ अफवा पसरल्या होत्या. अक्षय खन्नाने स्वतः एकदा त्याच्या मुलाखतीत सांगितले होते की ‘तो ऐश्वर्याच्या चेहऱ्याकडे पाहत रहायचा. दुसरीकडे, अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूर यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या अफेअरच्या बातम्यांसोबतच लग्नाच्या बातम्याही खूप चर्चेत होत्या. असे म्हटले जाते की करिश्मचे वडील रणधीर कपूर स्वतः अक्षयच्या वडिलांकडे म्हणजेच दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्याकडे गेले आणि त्यांच्याशी मुलांच्या लग्नाबद्दल विचारणा केली, पण करिश्माची आई बबिता या नात्यावर खूश नव्हत्या.

आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

या लग्नाला त्यांनी स्पष्ट नकार दिल्याचे म्हटले जाते. त्यावेळी करिश्माचे चित्रपट सुपरहिट ठरत होते. अशा वेळी बबिता यांना त्यांच्या मुलीने लग्न करून तिच्या करिअरला पूर्णविराम द्यायचा नव्हता. हाच विचार करून बबिता यांनी त्यांच्या मुलीचा अक्षय खन्ना सोबत लग्नाच्या विचारावर नकार दिला होता.

आणखी वाचा : “मी एक स्त्री आहे पार्सल नाही…”, प्रेग्नेंसी न्यूजवर संतापली आलिया भट्ट

यानंतर अक्षय खन्ना एका मुलाखतीत म्हणाला की, ‘मला वाटत नाही की मी जास्त काळ रिलेशनशिपमध्ये राहू शकेन. प्रत्येक नात्यात इतकं मोकळं असायला हवं की जेव्हा मन करेल तेव्हा दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जात आलं पाहिजे, पण लग्न झाल्यावर ते होत नाही. दुसरं म्हणजे, मला मुलं अजिबात आवडत नाहीत, हे देखील लग्न न करण्यामागचे एक कारण आहे. मी कधीच लग्न करणार नाही कारण मला आता एकटे राहायला आवडते.

आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर

पडद्यावर सर्वच चित्रपट हिट झाले, मात्र काही काळानंतर अक्षय खन्नाने चित्रपटसृष्टीपासून दुर झाला. यानंतर, त्याने २०१६ मध्ये पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, त्यानंतर तो ‘ढिशूम’ आणि ‘इत्तेफाक’ चित्रपटांमध्ये दिसला. एवढंच नाही तर अक्षय खन्नाने ‘स्टेट ऑफ सीज: टेंपल अटॅक’ या चित्रपटाद्वारे ओटीटीवर पदार्पण केले, हा चित्रपट जुलै २०१२ मध्ये OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshaye khanna did not marry after breaking up with karishma kapoor dcp
First published on: 29-06-2022 at 19:40 IST