scorecardresearch

तुकाराम महाराजांची बायको खरंच खूप कजाग होती का? मुलीचा विचित्र प्रश्न ऐकता किरण माने, म्हणाले…

किरण माने यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

kiran mane post for his daughter
किरण माने यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आई-वडील ज्या क्षेत्रात असतात त्याच क्षेत्रात मुलं पुढे करिअर करतात असे आपण बऱ्याचवेळा पाहतो. अभिनय क्षेत्रात तर आपण बऱ्याचवेळा पाहतो आणि ते काही आता नवीन राहिलेलं नाही. नेहमीच सोशल मीडियावर चर्चेक असणारे अभिनेता किरण मानेंच्या मुलीनेही अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. यानिमित्ताने किरण मानेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

किरण माने यांच्या मुलीचे नाव ईशा आहे. तिने अलीकडेच रंगभुमीवर सादरीकरण केले आहे. त्यानिमित्त ईशा सोबत झालेला संवाद किरण माने यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. “बाबा, तुकाराम महाराजांची बायको खरंच खूप कजाग होती का हो? मला दोन मिनिटं कसं सांगावं ते कळंना… म्हन्लं, कजाग नव्हती… तिची चिडचिड व्हायची. नवऱ्यानं ज्या व्यवस्थेविरोधात बंड पुकारलं होतं, ती लोकं किती कुटील कारस्थानी आहेत हे तिला माहिती होतं. नवऱ्यानं सरळ चारचौघांसारखा संसार करावा, हे त्या काळातल्या कुनाबी बाईला वाटनं साहजिकय. त्यांनी संसार उधळून दिला नव्हता, पन समाजकार्यामुळं संसार मोडकळीला आला होता. कधीकधी हे सहन न होऊन ती मनातली भडास काढत आसंल, कडाकडा भांडत आसंल… पन त्याचवेळी आपला नवरा किती महान हाय हे त्या माऊलीला आतनं माहीत होतं. तिचं अमाप प्रेम होतं त्यांच्यावर. मला सांग, घरापास्नं दूर मनन चिंतन करत, अभंग लिहीत बसलेल्या आपल्या नवऱ्याला भूक लागली आसंल म्हनून, भांबनाथाच्या नायतर भंडाऱ्याच्या डोंगरावर भाकरी घिवून जायचं.. ते बी अनवानी पायानं… पायात काटंकुटं मोडायचं, डोक्यावर तळपनारं ऊन असायचं… हे ‘प्रेम’ असल्याशिवाय शक्य हाय का गं?”, असे किरण माने म्हणाले.

आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

पाहा पोस्ट

आणखी वाचा : पोळी फुलत नाही? मग नक्कीच ट्राय करा ही ट्रीक

पुढे ते म्हणाले, “बापलेकीमधला हा संवाद मांडताना किरण पुढे म्हणाले की, ‘ईशा शांतपने ऐकत होती. म्हन्लं,”तुकारामांच्या बायकोचं खरं नांव काय होतं सांग?” ..ती म्हन्ली “जिजाई” …त्या काळात महाराज लाडानं तिला ‘आवली’ म्हनायचे, हे प्रेम नाहीतर काय??” ईशा हसली. म्हन्लं, “अगं ते मनापासुन संसार करत होते आवलीसोबत. सुखानं. त्यांना पाच मुलं झाली. तुकोबाराया गेले तेव्हा आवली सहा महिन्यांची गरोदर होती. त्यांच्या पश्चात तीन महिन्यांनी त्यांना सहावा मुलगा झाला.”

आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर

पुढे किरण माने म्हणाले, “आता पुढचं महत्त्वाचं ऐक. त्या सहाव्या मुलाचं नांव नारायण. नारायण आपल्या बापासारखा व्हावा, या इच्छेपोटी आवलीनं त्याला वारकरी पंथाची शिकवण दिली! जगद्गुरू तुकोबारायांनंतर वारकरी पंथाची पताका मोरे घरान्यात कुनी खांद्यावर घेतली आसंल तर ती नारायण महाराजांनी !! एवढंच नाही तर ‘ग्यानबा-तुकाराम’ हा गजर नारायण महाराजांनी लिहीला आणि सुरू केला !!! माऊली-तुकोबांची संयुक्त पालखीही त्यांनीच सुरू केली.. हे सगळं का केलं?? तर आईची-तुकोबांच्या आवलीची-इच्छा होती, की आपल्या मुलानं बापाच्या पावलावर पाऊल ठेवावं… आता मला सांग ती नवर्यावर वैतागलेली, कजाग असेल का गं?”

आणखी वाचा : राज ठाकरेंबद्दलचं ‘ते’ वाक्य गायब का झालं?; ‘धर्मवीर’मधील सीन शेअर करत अमेय खोपकरांनी सांगितली ‘राज’ की बात

पुढे ईशाच्या रिअॅक्शन विषयी बोलता किरण माने म्हणाले, “ईशा रडत होती. मी म्हटलं, आज मी खूप आनंदी आहे की तू आवलीची भुमिका करणार आहेस. प्रयोगाला येऊ शकत नाही, पन तू मनापास्नं कर. माझी आवली रागीट होती, भांडकुदळ होती पन आत प्रेमाचा झरा होता तो विसरू नकोस’, किरण यांनी असं म्हटलं आहे.”

आणखी वाचा : “मी एक स्त्री आहे पार्सल नाही…”, प्रेग्नेंसी न्यूजवर संतापली आलिया भट्ट

पुढे ईशा विषयी सांगताना म्हणाले, “ईशानं काल आवली सादर केली. मी बोलून दाखवलं नाय, पन मला लै लै लै भरून आलं होतं. ईशा तुकोबामय तर झाली होतीच, तिच्यासोबत रखुमाई करणारी अनुष्का आपटेही विठ्ठलमय झाली होती असं ऐकलं. ईशानं अभिनयक्षेत्रात जायचा निर्णय घेतल्यावर, माझ्या बेफिकीर वृत्तीमुळं होणारा सगळा त्रास सहन करुनही तिच्या पाठीशी ठामपणे उभी रहाणारी माझी बायकोही आज मला नव्यानं उमगू लागलीय.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kiran mane facebook post for his daughter who recently performed on stage as a available dcp

ताज्या बातम्या