Alia Bhatt says her bond with Ranbir Kapoor changed after Raha : ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या चॅट शोमध्ये वरुण धवन आणि आलिया भट्ट पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील विविध पैलूंवर चर्चा केली. वरुण म्हणाला की, वडील होण्याने तो बदलला आहे. आलिया भट्टने रणबीर कपूरबरोबरच्या तिच्या नात्याबद्दलही चर्चा केली. तिने सांगितले की रणबीर आणि ती मित्र आहेत आणि ते दोघेही एकमेकांना ट्रोल करतात. तिने असेही उघड केले की त्यांच्या मुलीच्या जन्मापासून त्यांचे नाते बदलले आहे.

रणबीरबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना आलिया म्हणाली की, तिची आणि रणबीरची मैत्री नैसर्गिक आहे. त्यांचे नेहमीच बेस्ट-फ्रेंड नाते राहिले आहे. आलिया म्हणाली की तिने रणबीरशी लग्न केले, कारण तो तिच्याशी खूप चांगला आहे आणि तो खूप चांगला माणूस आहे.

आलिया आणि रणबीरचे नाते कसे आहे?

आलियाने खुलासा केला की दोघांनाही एकमेकांना ट्रोल करायला आवडते. ती म्हणाली, “१०० टक्के मला त्या व्यक्तीला ट्रोल करायला सर्वात जास्त आवडते आणि त्याला (रणबीर) सर्वात जास्त ट्रोल करायला आवडते ती मीच आहे आणि मला वाटते की दोन व्यक्तींमध्ये एक अतिशय नैसर्गिक गतिशीलता असते.”

आलिया पुढे म्हणाली की त्यांच्या मुलीच्या जन्मापासून त्यांचे नाते बदलले आहे. आता त्यांचे नाते पूर्णपणे वेगळे आहे. ती म्हणाली की ते आता एक युनिट आहेत. त्यांनी भव्य ठिकाणी लग्न करण्याऐवजी घरी लग्न करण्याचा का निर्णय घेतला हे देखील आलियाने स्पष्ट केले. ती म्हणाली, “आम्हाला आमचे जवळचे लोकं आमच्या आजूबाजूला हवे होते.”

आलिया भट्ट व रणबीर कपूर हे सेलिब्रिटी जोडपे कायमच चर्चेत असते. कधी त्यांच्या चित्रपटांतील भूमिकांमुळे, तर कधी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे हे कलाकार लक्ष वेधून घेत असतात. आलिया भट्ट ही बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

आलिया-रणबीरच्या कामाबाबत बोलायचे तर रणबीर कपूर लवकरच ‘रामायण’ या चित्रपटात दिसणार आहे. याआधी तो ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. तसेच त्याच्या भूमिकेचीदेखील चांगलीच चर्चा झाली होती. याबरोबरच, संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये रणबीर, आलिया व विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.