एकीकडे देश करोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंज देतोय, तर दुसरीकडे बॉलिवूडमधील काही सेलिब्रीटी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेले होते. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नुकतंच मालदीवच्या पर्यटन विभागाने भारतातून आलेल्या पर्यटकांवर तात्पुरती बंदी आणलीय. म्हणून सुट्टी घालवण्यासाठी गेलेल्या बॉलिवूडच्या सेलिब्रीटींना मुंबईत परतावं लागलं. हे सेलिब्रीटी मुंबईत आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना “कशी राहीली मालदीव ट्रीप?” असा प्रश्न करत चांगलंच ट्रोल केलंय.

एकीकडे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतीय हतबल झाले आहेत. देशातील नागरिकांना मदत करण्याऐवरी हे बॉलिवूड सेलिब्रीटी सुट्टीचा आनंद घालवण्यासाठी मालदीवला गेले होते. मालदीवच्या सुट्टीवरुन नेटीझन्सनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं होतं. यात बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनीही मालदीवच्या सुट्टीवर गेलेल्या सेलेब्सना चांगलेच खडसावले. त्यातच भारतात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यानं मालदीव पर्यटन विभागाने भारतीय पर्यटकांवर बंदी आणली. त्यामुळे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या या सेलिब्रीटींना नाईलाजाने मालदीववरून परतावं लागलं. यात बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स आलिया भट्ट आणि रणबीर कपूर तसंच टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे देखील होते.

हे लव्ह बर्ड्स मुंबईत परतल्यानंतर सोशल मिडीयावर नेटीझन्सनी त्यांची खिल्ली उडवायला सुरवात केलीय. वेगवेगळ्या मीम्स शेअर करत “कशी राहीली मालदीव ट्रीप ?” असा प्रश्न विचारत त्यांची खिल्ली उडवली जातेय. “यांना परत पाठवा…परत मुंबईत येण्याची गरजंच काय होती…?” असं देखील नेटीझन्स या सेलिब्रीटींना ट्रोल केलंय. मालदीवच्या फसलेल्या ट्रीपवरून सोशल मिडीयावर तर त्यांची खिल्ली उडवणाऱ्या वेगवेगळ्या मीम्सचा अक्षरशः पाऊस पडतोय.

अभिनेत्री आलिया भट्ट हीने नुकतीच एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये लिहीताना ती म्हणाली, “सध्या मोठा अनिश्चीत काळ सुरूये…पायाभूत सुविधा आणि माहिती ही सध्या काळाची गरज आहे…आपल्याला संसाधनांची मर्यादा आहे, आणि गरजूंपर्यंत योग्य माहिती पोहचली तर त्यांना मदत होईल…” यापुढे ती म्हणाली, ” मला याचा आनंद होतोय की मी या मोहिमेसाठी फाए डिसुजा यांच्या माध्यमातून जोडली गेलीये. या मोहिमेच्या माध्यमातून मी जास्तित जास्त लोकापर्यंत माहिती कशी पोहोचली जाईल यासाठी प्रयत्न करीत राहील…याही पलिकडे आणखी काही मदतीची गरज पडली तर ती ही करेल..मला खात्री आहे कोरोना काळात याची मदत नक्की होईल..स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.. “