बिग बी अमिताभ बच्चन यांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करतात. वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी अमिताभ चित्रपटांमध्ये तितक्याच जिद्दीने काम करत आहेत. आता त्यांचा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटामध्ये त्यांची भूमिका, लूक कसा असणार? याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेरीस ‘ब्रम्हास्त्र’मधील बिग बी यांचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “महाराष्ट्रात आत्ताच पळून यावं वाटतं कारण…”, हिमाचल प्रदेशमध्ये गेलेली प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

धर्मा प्रॉडक्शनने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अमिताभ यांचा रुपेरी पडद्यावर कधी न पाहिलेला लूक दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ यांच्या चेहऱ्यावर दोन ठिकाणी जखम दिसत आहे. हातात तलवार आहे. तसेच त्यांची नजर समोरच्याला थक्क करणारी आहे. त्यांच्या या लूकला काही मिनीटांमध्येच नेटकऱ्यांची भरभरुन पसंती मिळाली आहे.

“गुरू है गंगा ज्ञान की काटे भाव का पाश, गुरू उठा ले अस्त्र जब करे पाप का नाश” असं धर्मा प्रॉडक्शनने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ गुरु रुपात दिसणार असल्याचं यामधून स्पष्ट होत आहे. अमिताभ यांचा लूक पाहून आम्ही चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहोत असं चाहत्यांनी कमेंट करत म्हटलं आहे.

आणखी वाचा – अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’चे शो रद्द, चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकच नसल्यामुळे घेतला निर्णय

काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरलाही प्रेक्षकांना पसंती दिली होती. या चित्रपटामध्ये अमिताभ यांच्याबरोबरच मौनी रॉय, आलिया भट्ट. रणबीर कपूर, मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट ९ सप्टेंबरला हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड भाषेमध्ये सर्वत्र प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan brahmastra look guru viral on social media and fans appreciate actor look kmd