बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांता नातू अगस्त्य नंदा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी अगस्त्य नंदा आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या ऑफिसमधून बाहेर पडताना दिसले. झोया अख्तर यांना ‘द आर्चीज’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. या चित्रपटात अगस्त्य नंदा आणि सुहाना खान आणि खुशी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अगस्त्य झोया यांच्या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, “झोयाच्या चित्रपटात श्वेता बच्चन नंदा यांचा मुलगा अगस्त्य नंदा आर्चीची भूमिका साकारणार आहे. यात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील दिसणार आहे. या दोघांशिवाय ज्या लोकांच फिल्मी बॅकग्राऊंड नाही ते देखील दिसणार आहेत. या चित्रपटासाठी झोया अख्तरने अनेक तरुण मुला-मुलींचे ऑडिशन घेतले.

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

आणखी वाचा : एवढे पैसे कुठून आले? गाडी घेतल्यानंतर धमक्यांचे फोन; व्हिडीओ शेअर करत युट्यूबरने दिले स्पष्टीकरण

रिपोर्ट्सनुसार, असे सांगण्यात येत आहे की, चित्रपटाचे निर्माते सुहाना खानवर वेगवेगळे लूक ट्राय करत आहेत. काही दिवसांपूर्वी सुहाना खान लाल रंगाच्या साडीत नवीन आली होती. सुहानाचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सुहानाच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या तयारीपैकी ही एक तयारी असल्याचे सुत्रांचे म्हटले जाते. चित्रपटात सुहाना भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही लूकमध्ये दिसणार आहे.

आणखी वाचा : ‘झुंड’ मराठीत का नाही केला? नागराज मंजुळे म्हणाले; “मग मी म्हणतो पुष्पा..”

आणखी वाचा : युक्रेनच्या ‘या’ महिलेला घाबरत होते रशियाचे राष्ट्रपती पुतिन

दरम्यान, दुसरीकडे अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने आधीच स्पष्ट केले होते की तिला अभिनय करण्याची इच्छा नाही. ती तिचा कौटुंबिक व्यवसाय सांभाळणार. तर अगस्त्यला चित्रपट आणि अभिनयाची आवड आहे आणि तो त्यासाठी तयारीही करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan grandson agastya nanda will debut with shahrukh khan daughter suhana khan khushi kapoor dcp