सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक अशी जागा आहे जिथे काही लोक एका रात्रीत सुपरस्टार होतात. तर सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेली जोडी म्हणजे गणेश शिंदे त्याची पत्नी योगिता शिंदे आणि शिवानी शिंदे आहे. त्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. त्यांच्या व्हिडीओला मिलियन्समध्ये व्ह्यूज असतात. त्यांच्यात असलेला निरागस पणा, त्यांची साधी राहणीमान हेच नेटकऱ्यांना प्रचंड आवडतं. पण आता त्यांनी गाडी घेतल्यामुळे त्यांना फोन करून धमक्या दिल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी गणेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत त्यांनी नवीन गाडी घेतल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला फोन करत धमकी द्यायला सुरुवात केली आहे. तर अनेकांना त्या व्हिडीओवर कमेंट करत गाडी घेण्यासाठी एवढे पैसे कुठून आले?, असा प्रश्न विचारला आहे.
आणखी वाचा : युक्रेनच्या ‘या’ महिलेला घाबरत होते रशियाचे राष्ट्रपती पुतिन
आणखी वाचा : आई कुठे काय करते : मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट
गणेशने फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर युट्यूबवरून हे सगळे पैसे कमावले असं गणेशने या व्हिडीओत सांगितलं. हा व्हिडीओ त्याने संपूर्ण कुटुंबासोबत गाडीतच शूट केला आहे. या व्हिडीओत गणेश म्हणाला, “युट्यूब व्हीडिओला मिळणाऱ्या व्ह्यूजमधून आणि जाहिरातींमधून आम्ही हे पैसे कमावले. तसंच आम्हाला काही कार्यक्रमांमध्ये ही बोलावलं जातं आहे. त्यातूनही आम्हाला पैसे मिळतात ते पैसे साठवून त्यातून आम्ही ही गाडी घेतली आहे”, असं गणेश आणि योगिता शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.