बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ चित्रपटाची शूटिंग करत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत साऊथची लोकप्रिय अदाकारा रश्मिका मंदाना देखील झळकणार आहे. नुकतंच बिग बींनी त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ चित्रपटाच्या सेटवर फादर्स डे साजरा केला. यावेळी बिग बींनी त्यांच्या चित्रपटातील एका खास को-स्टारचा परिचय सोशल मीडियावरून करून दिला. या को-स्टारमुळे सेटवरील संपूर्ण वातावरणंच प्रसन्न होऊन जातं, असं देखील बिग बींनी म्हटलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमिताभ बच्चन यांच्या ‘गुडबाय’ चित्रपटाच्या सेटवर फादर्स डे चं सेलिब्रेशन झालं. या चित्रपटातील को-स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना, पावेल गुलाटी आणि एली अवराम यांनी फादर्स डे निमित्ताने बिग बींना अनोखं सरप्राईज दिलं. को-स्टार्सनी दिलेलं हे सेलिब्रेशन पाहून बिग बींना आनंद झाला. हा आनंद त्यांच्या फॅन्ससोबत शेअर करण्यासाठी या सेलिब्रेशनचे फोटोज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबतच त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिली. यात त्यांनी लिहिलं, “हा दिवस माझ्या आगामी चित्रपटातील दिग्दर्शक आणि कलाकारांसोबतच्या अविस्मरणीय आठवणी देणारा ठरला. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने सगळ्यांनीच फादर्स डे मनावर घेतलं आणि सगळ्यांनी मिळून माझ्यासाठी केक आणला आणि मला पुष्पगुच्छ भेट म्हणून दिलं. आपण पाहत असाल चित्रपटातील सगळ्या कलाकार परिवाराचा मी वडिलधारी असल्यासारखा वाटतोय.”

(Photo: Amitabh Bachchan/Blog)
(Photo: Amitabh Bachchan/Instagram)

या सेलिब्रेशनप्रसंगी एका को-स्टार्सने मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. या को-स्टारचा परिचय करून देण्यासाठी बिग बींनी एक फॅमिली फोटो देखील शेअर केलाय. या फोटोसोबत त्यांनी लिहिलं, “जेव्हा हा को-स्टार सेटवर असतो तेव्हा सेटवरचं वातावरणंच बदलून जातं. म्हणूनच तो इथल्या सर्व महिला-पुरूष कलाकारांचा आवडता को-स्टार बनलाय.”

या चार पायाच्या को-स्टारची कामगिरी पाहून कसा आनंद वाटतोय, हे देखील बिग बींनी या पोस्टमधून सांगितलंय. हे सांगताना बिग बींनी लिहिलं, “या चार पायाच्या को-स्टारला त्याचा प्रशिक्षक चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रशिक्षण देतो आणि सेटवर तो त्याच्या परफॉर्मन्सने सगळ्यांचीच मन जिंकून घेतो. हा एका मानवी कलाकारापेक्षाही काही कमी नाही. त्याला चेहऱ्यावरचे हावभाव कळतात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला ‘फेसिंग्स’ देखील कळतं…म्हणजे कॅमेरा कोणत्या दिशेला आहे, कोणत्या दिशेला पाहून परफॉर्मन्स करायचा आणि कॅमेऱ्याच्या कोणत्या दिशेला आपला चेहरा व्यवस्थित दिसेल हे सगळं त्याला कळतं.”

तसंच एका प्राण्यासोबत आणि लहान मुलांसोबत अभिनय करणं किती कठीण असतं याबद्दल देखील बिग बींनी या पोस्टमध्ये लिहिलंय. यात त्यांनी लिहिलंय, “शूटिंगच्या सेटवर प्राण्यांना आणि लहान मुलांना सांभाळणं खूप कठीण असतं. पण हा को-स्टार एकदम परफेक्ट आहे. केवळ मोहक….हल्ली आता जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान लहान मुलं देखील आपल्याकडे येतात आणि विचारतात, तुम्ही किती जाहिराती केल्या आहेत…जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल की १० १५ जाहिराती केल्यात..हे ऐकून ते डोक्याला हात लावतील आणि म्हणतील अंकल आम्ही तुमच्यापेक्षा जास्त ३५ जाहिराती केल्या आहेत…यंदाची नवी पिढी ही खूप वेगळी आहे….जग बदलत चाललंय आणि आजुबाजुला देखील घडणाऱ्या गोष्टी बदलत आहेत”, असं देखील या पोस्टमध्ये बिग बींनी म्हटलंय.

यापूर्वी सुद्धा बिग बींचा सुपरहिट चित्रपट ‘मर्द’ मध्ये त्यांचे को-स्टार्स एक घोडा आणि एक कुत्रा सुद्धा होता. या दोन्ही को-स्टार्ससोबत या चित्रपटात बरेच मन जिंकून घेणारे सीन्स शूट करण्यात आले होते. सध्या बिग बी त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटातही त्यांचा को-स्टार एक कुत्रा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan introduces goodbye co star when he is on the set the whole atmosphere changes prp