बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. चाहते सुद्धा बिग बींच्या नव नव्या पोस्टसाठी आतुरतेने प्रतिक्षा करत असतात. नुकतंच बिग बींनी त्यांच्या सोशल मीडियावर दोन फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिग बी आपले दिवंगत पिता हरिवंश राय बच्चन यांच्या कविता वाचत असताना दिसून आले. बिग बी आपल्या वडिलांनी लिहिलेल्या कवितांना आपल्या आवाजात रेकॉर्ड करत आहेत.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हे दोन फोटोज शेअर केले आहेत. एक फोटो कलरफुल तर फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट दिसून येतोय. “पूज्य बाबूजींच्या लेखनापासून स्वतःला दूर ठेवता येत नाही…आणि आता त्यांचं उच्चारण, स्वतःच्या स्वरात…” असं लिहित त्यांनी हे दोन फोटोज शेअर केले आहेत. बिग बी यापूर्वी अनेकदा गुणगुणताना दिसून आले आहेत. ते अनेकदा मोकळा वेळ काढून आपल्या वडिलांनी लिहिलेल्या कवितांचे स्मरण करत असतात.
T 3966 – पूज्य बाबूजी के लेखन से अपने आप को ज़्यादा दूर नहीं रखता ; और अब उनका उच्चारण , अपने स्वर में pic.twitter.com/rdL6Jfexzv
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 14, 2021
यापूर्वी बिग बींनी २० जून रोजी फादर्स डे निमित्ताने वडिलांसोबतचा फोटो शेअर केला होता. ‘पिता’ फक्त इतकंच लिहून त्यांनी तो फोटो शेअर केला होता. बिग बींनी शेअर केलेला तो फोटो चाहत्यांच्या मनाला भावला होता.
लवकरच या चित्रपटांमध्ये झळकणार बिग बी
बिग बींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चित्रपटांसाठी चर्चेत आले आहेत. लवकरच रिलीज होत असलेल्या ‘नजर’ चित्रपटातून ते भेटीला येणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात रिया चक्रवर्ती सुद्धा दिसणार आहेत. सोबत ते ‘गुडबाय’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सुद्दा व्यस्त आहेत. याशिवाय ते आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात सुद्धा दिसणार आहेत.