Amitabh Bachchan Latest Post : ११ ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांचे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी जलसा येथे पोहोचले आणि बिग बींनी त्यांना भेटवस्तू वाटल्या. अमिताभ सोशल मीडियाद्वारेही त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले राहतात. त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

१० ऑक्टोबर रोजी पहाटे २:३८ वाजता अमिताभ यांनी एक्सवर लिहिले, “बोलायला शिकण्यासाठी दोन वर्षे लागली आणि गप्प राहायला शिकण्यासाठी ८० वर्षे लागली.” या ओळी त्यांचे दिवंगत वडील हरिवंश राय बच्चन यांच्या आहेत, ज्या अमिताभ यांनी पोस्ट केल्या आहेत आणि त्यांचे चाहते त्यांच्यावर खूप कमेंट्स करीत आहेत.

अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले असतात. त्यांना समोरासमोर भेटणे असो किंवा सोशल मीडियावर त्यांच्यासाठी पोस्ट करणे असो, ते नेहमीच त्यांच्या चाहत्यांना अनवाणी भेटतात. त्यांनी एकदा इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून याचे कारण स्पष्ट केले होते. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते, “ते मला विचारतात… ‘चाहत्यांना अनवाणी कोण भेटायला जाते?’ मी त्यांना सांगतो, ‘मी जातो… तुम्ही अनवाणी मंदिरात जाता… रविवारी, माझे हितचिंतक माझे मंदिर आहेत. तुम्हाला यात काही अडचण आहे.”

अमिताभ बच्चन यांना शेवटचे नाग अश्विनच्या ‘कल्की २८९८ एडी’ आणि रजनीकांत यांच्याबरोबर ‘वेट्टायन’मध्ये पाहिले होते. रणबीर कपूर अभिनीत ‘रामायण’मध्ये ते एका भूमिकेसाठी आवाज देणार असल्याचेही वृत्त आहे. हे अद्याप निश्चित झालेले नाही. ते ‘कौन बनेगा करोडपती १७’चे सूत्रसंचालन करीत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी काल (११ सप्टेंबर) त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा केला. पण, वाढदिवशी बिग बींनी स्वत:ला खास गिफ्ट दिलं आहे. अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. त्यामुळे आता अमिताभ बच्चनही अलिबागकर झाले आहेत. ते ८३ वर्षांचे झाले आहेत. वयाची ऐंशी पार केल्यानंतरही बिग बी सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. टेलिव्हिजनपासून मोठ्या पडद्यापर्यंत ते विविध प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अमिताभ बच्चन जवळजवळ ५६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करीत आहेत.