"मला लोक उंट म्हणायचे कारण...", महानायक अमिताभ बच्चन यांनी शेअर केला जुना फोटो आणि म्हणाले… | Amitabh Bachchan shares pic from Reshma aur Shera sets says people called him a camel | Loksatta

“मला लोक उंट म्हणायचे कारण…”, महानायक अमिताभ बच्चन यांनी शेअर केला जुना फोटो आणि म्हणाले…

अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची बाब पोस्ट केली आहे

Amitabh Bacchan
काय म्हटलं आहे अमिताभ बच्चन यांनी?

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा चाहता न सापडणं विरळाच. त्यांना भेटण्यासाठी त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक आजही जलसा या बंगल्याबाहेर लोक आजही जमतात. अमिताभ बच्चन यांच्या अभियनासोबत त्यांची उंचीही अनेकांना आवडते. मात्र तुम्हाला माहित आहे का? लोक त्यांना एके काळी उंट म्हणायचे. ही गोष्ट स्वतः अमिताभ बच्चन यांनी स्वतःच सांगितली. अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या फोटोसोबत त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे आणि सांगितलं की मला एके काळी लोक उंट म्हणायचे. अमिताभ बच्चन यांनी विविध प्रकारच्या कमेंट देत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी काय म्हटलं आहे?

अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट काही तासांपूर्वीची आहे. त्यात अमिताभ बच्चन हे एका उंटावर बसले आहेत. तसंच हा एका सेटवरचा फोटो आहे पोस्ट पाहून कळतं आहे. अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे की हा फोटो १९६९ मध्ये सिनेमा विश्वात आलो तेव्हा अनेक लोक मला ऊंट म्हणायचे. त्यानंतर मी ठरवलं की मी हे खरं करून दाखवेन. मग मी एका ऊंटावर चढलो. हा फोटो माझा दुसरा सिनेमा रेश्मा आणि शेरा या सिनेमातला आहे. हे ठिकाण जैसलमेरपासून खूप दूर पोचीना या ठिकणी आहे. आता बरं आहे की मला कुणी ऊंट म्हणत नाही. यासोबत अमिताभ बच्चन यांनी काही फनी इमोजी केल्या आहेत. या पोस्टवर लोक अनेक कमेंट करत आहेत.

काय म्हणाले युजर?

एक युजर म्हणाला की माझे काका दिलीप कुमार यांचे चाहते होते. त्यावेळी ते तुम्हाला ऊंट म्ङणायचे. त्यामुळे मी त्यांच्याशी वाद घालायचो. एक चाहता म्हणाला की लोकांनी तुम्हाला अगदी योग्य नाव दिलं होतं कारण ऊंट वाळवंटात न थकता अनेक उंच उंच ठिकाणी जातो. त्याचप्रमाणे बॉलिवूडची अनेक उंच शिखरं तुम्ही गाठली आहेत. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 22:31 IST
Next Story
“मी नमाज पठण करत असताना आदिलने लाथेने…”, राखी सावंतने सांगितला ‘तो’ प्रसंग