मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला दोन दिवस मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात काढावे लागले. आर्यनची जामिनावर सुटका झाल्यानंतर मात्र त्याला कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. या अटींची पूर्तता करण्यासाठी आज आर्यन खान एनसीबी कार्यालयात हजर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागेल, अशी अट कोर्टाने घातली होती. या अटीनुसार, आर्यन आज शुक्रवारी ५ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजर झाला. यावेळी त्यासह त्याचा पर्सनल बॉडीगार्डही उपस्थित होता. आर्यन हा सफेद रंगाच्या रेंज रोव्हर suv या गाडीतून एनसीबी ऑफिसमध्यो पोहोचला. यावेळी त्याने पिवळ्या रंगाचे स्वेटशर्ट घातले होते.
शुक्रवारी आर्यन हजेरी लावण्यासाठी एनसीबीच्या ऑफिसमध्ये येणार असल्याची माहिती आधीपासूनच प्रसारमाध्यमांना होती. आर्यन त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अनेकांनी त्याच्याभोवती गराडा केला. दरम्यात कोर्टाने घालून दिलेल्या नियमांमध्ये आर्यनने एनसीबी ऑफिसमध्ये हजेरी लावली. नियमाप्रमाणे एनसीबी कार्यालयात हजेरी लावल्यानंतर तो पुन्हा मन्नतकडे रवाना झाला.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, गुरुवारी २९ ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला होता. शाहरुखची मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी संध्याकाळी २३ वर्षीय आर्यनच्या जामिनासाठी ड्रग्जशी संबंधित खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टात हजर झाली. हायकोर्टाने शुक्रवारी आपल्या आदेशाचा मुख्य भाग उपलब्ध करून दिला ज्यामध्ये आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनदारावर आणि तत्सम रकमेच्या दोन जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.