‘बिग बॉस १९’ची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. या वादग्रस्त शोबद्दल सतत नवीन अपडेट्स येत आहेत. यावेळी शोमध्ये बरेच बदल होणार आहेत. आतापर्यंत ‘बिग बॉस १९’मध्ये सहभागी होण्यासाठी अनेक स्टार्सची नावेही समोर येत आहेत. अनेक स्टार्सची नावेही निश्चित केली जात आहेत. अशा परिस्थितीत या शोसाठी चर्चेत आलेले नाव ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हे नाव दुसरे-तिसरे कोणी नसून दीपिका पादुकोणच्या एक्स बॉयफ्रेंडचे आहे.

‘बिग बॉस १९’चा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता मुझम्मिल इब्राहिम आहे. मुझम्मिलने अलीकडेच ‘फिल्मीबीट’ला मुलाखत दिली. त्यादरम्यान मुझम्मिलने सांगितले की त्याला ‘बिग बॉस १९’ची ऑफर मिळाली होती; पण त्याने ती नाकारली. मुझम्मिल म्हणाला, ‘बिग बॉस हा एक रिअॅलिटीवर आधारित शो आहे; टॅलेंट शो नाही. त्यात टॅलेंट नाही; मग मी तिथे जाऊन काय करू. हा माझ्या शैलीचा शो नाही.

मुजम्मिलला जायचे आहे ‘या’ शोमध्ये…

यादरम्यान, जेव्हा अँकरने मुजम्मिल इब्राहिमला विचारले, ‘तुम्हाला भविष्यात कधी जायचे आहे का?’, तेव्हा अभिनेता म्हणाला, “ज्यांनी माझ्याकडे अप्रोच करण्याचा प्रयत्न केला, मी त्यांना एकेक करून ब्लॉक केले आहे.” त्यानंतर अँकरने विचारले, “तुम्हाला कधी ‘खतरों के खिलाडी’ शोमध्ये जायचे आहे का?” त्यावर अभिनेत्याने उत्तर दिले, “हो, किमान त्या शोमध्ये प्रतिभा आहे, जी पाहता येते; पण बिग बॉसमध्ये नाही.”

मॉडेलिंगच्या काळात दीपिकाला केले डेट

दीपिकाच्या मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे २००२ मध्ये ती मुंबईत आल्यानंतर दीपिका पदुकोण व मुझम्मिल इब्राहिम दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, असे वृत्त आहे. नंतर त्यांनी हे नाते संपवले. दीपिकाचे रणवीर सिंहशी लग्न होईपर्यंत दोघेही मित्र राहिले. ब्रेकअपनंतर ते संपर्कात होते; परंतु दीपिकाच्या लग्नानंतर त्यांनी बोलणे बंद केले, असेही त्याने उघड केले.

बिग बॉसशी संबंधित अपडेट्स देणाऱ्या biggboss.tazakhabar ने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक लेटेस्ट पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, यावेळी ‘बिग बॉस १९’च्या घरात जेल राहणार नाही. ‘बिग बॉस १९’चा प्रीमियर २४ ऑगस्ट रोजी होईल.