बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमारच्या आईची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे शूटिंग सोडून तात्काळ मुंबईला परतावे लागले आहे. काल अक्षयची आई अरुणा भाटिया यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. अभिनेता अक्षय कुमारला ही बातमी कळताच तो लंडनहून मुंबईत परतला आहे. अक्षय कुमार दिग्दर्शक रंजीत तिवारी यांचा आगामी चित्रपट ‘सिंड्रेला’ च्या शूटिंगसाठी काही दिवसांपासून लंडनमध्ये होता. मात्र आईच्या प्रकृतीची ठिक नसल्याने तो काल  मुंबईत परतला आहे. अक्षय सोबतच त्याचे फॅन्स देखील त्याच्या आईच्या प्रकृती बाबत चिंता व्यक्त करताना दिसले, यानंतर आत अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट करत फॅन्सचे आभार व्यक्त करताना दिसला.

अक्षय कुमार सोशल मीडियावर सक्रिय असतो तसंच वेळोवेळी पोस्टद्वारे त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधत असतो. नुकतीच अक्षयने इन्स्टाग्रावर त्याच्या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आईच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना चाहत्यांचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये तो म्हणतो , “माझ्या आईच्या प्रकृतीबद्दल तुमची एवढी काळजी पाहून मी निशब्द झालो आहे. हा काळ मी आणि माझ्या कुटुंबासाठी हा काळ फार कठीण आहे. तुम्ही सगळ्यांची प्रार्थना खूप मदतीची ठरेल, ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये हात जोडलेला इमोजी देखील दिला आहे.”

अक्षय कुमारचं त्याच्या आईशी खुपच जवळचं नातं आहे. अक्षय लंडनमध्ये ‘सिंड्रेला’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. ज्या सीनमध्ये अक्षय कुमार नाही ते सीन पूर्ण करुन घेण्यास अक्षयने दिग्दर्शकाला सांगितलं असल्याचं कळतंय. अक्षयच्या आई अरुणा भाटिया यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल केल असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप अरुणा भाटिया यांना नेमकं काय झालंय याची माहिती समोर आलेली नाही. अक्षय कुमारच्या ‘सिंड्रेला’ चित्रपटात अभिनेत्री रकुलप्रीत सिंह मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसंच अक्षय कुमार ‘सूर्यवंशी’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षा बंधन’, ‘राम सेतु’ आणि ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात देखील झळकणार आहे.