बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. याचा मोठा फटका शिल्पा शेट्टीला देखील बसला. त्यानंतर शिल्पा शेट्टीसंदर्भात देखील बऱ्याच चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे सध्या शिल्पा आणि तिच्या कुटुंबियांवर अनेक संकटे ओढवली आहेत. या कठीण प्रसंगात ती पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करत आहे. या मागचे काय कारण आहे हे तिने एका व्हिडीओत शेअर केले आहे.

सोमवारी शिल्पाने एक पोस्ट शेअर केली होती. यात ती कठीण काळात ती पॉझिटिव्ह कशी राहते हे सांगितले आहे.  तिने शेअर केलेल्या व्हिडीओत ती योगा करताना दिसली आहे. यात ती वीरभद्रासना आणि मलासना असे दोन योगाचे प्रकार करत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शन दिलं की,”तुम्ही स्वत:चं स्वत:चे योद्धा बना; तुमच्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी, त्याचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग व्हा! जेव्हा केव्हा आयुष्यात चढ-उतार आले मी योगाकडे वळाले.  दिनचर्येतील सर्वात उत्साहवर्धक योग म्हणजे वीरभद्रासन” असं म्हणत शिल्पाने काही योगासनांचे  महत्व सांगितले आहे.

शिल्पा शेट्टीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतं आहे. या व्हिडीओत शिल्पाने योगाचे कपडे परिधान केले आहेत. या कठीण काळात देखील ती सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न या व्हिडीओद्वारे करताना दिसली आहे. तिने शेअर केलेला या व्हिडीओवर नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान राजच्या अटकेनंतर शिल्पा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसली नाही. एवढंच नाही तर शिल्पा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोमध्ये ही दिसली नाही. मात्र आता शिल्पाने पुन्हा एकदा या शोच्या चित्रकरणाला सुरुवात केली आहे.