बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खान व पहिली पत्नी रीना दत्ता यांची लेक आयरा ३ जानेवारीला लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर नोंदणी पद्धतीने आयराने लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. शिवाय लग्नातील दोघांच्या हटके लूकची चांगली चर्चा रंगली होती. आता आयरा-नुपूरचं नोंदणी पद्धतीनंतर मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा होणार आहे. उदयपूरमध्ये आजपासून ते १० जानेवारीपर्यंत आमिरच्या लेकीचा समारंभपूर्वक लग्नसोहळा होणार आहे. खान, शिखरे कुटुंबाबरोबर अनेक कलाकार उदयपूरमध्ये पोहोचले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माध्यमांच्या माहितीनुसार, आज सूफी नाइट आयोजित करण्यात आली आहे. तर उद्या, ८ जानेवारीला मेहंदी सोहळा होणार आहे. विशेष म्हणजे उदयपूरच्या स्थानिक महिला आयराला मेहंदी काढणार आहेत. त्यानंतर ९ जानेवारीला मेवाड लॉनमध्ये संगीत सोहळा रंगणार आहे आणि १० जानेवारीला मयूर बागमध्ये लग्नसोहळा पार पडणार आहे. असा शाही लग्नसोहळा आयरा-नुपूरचा पाहायला मिळणार आहे. पण त्यापूर्वी दोघांची संपत्ती किती आहे? लग्नानंतर आयरा-नुपूर एकूण किती संपत्तीचे मालक झालेत? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: ‘अ‍ॅनिमल’च्या सक्सेस पार्टीत रणबीर कपूरने रश्मिका मंदानाला केलं किस, व्हिडीओ व्हायरल

वडील आमिर खान प्रथितयश अभिनेता, निर्माता असल्याने आयराकडे स्टारकिड म्हणून पाहिलं जातं. तिचं एकाबाबतीत नेहमी कौतुक होतं असतं. ती लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करते, त्यामुळे तिला एक प्रेरणादायी तरुणी म्हणून अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. तिनं स्वतःची Agatsu नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे. ही स्वयंसेवी संस्था मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर काम करते. याशिवाय आयरा जोया अख्तरच्या प्रोडक्शन हाऊसची सहयोगी आहे. तसंच तिनं एक प्राचीन ग्रीक शोकांतिकेवर एक नाटक दिग्दर्शित केलं होतं. ज्यामध्ये तिचा भाऊ जुनैद खान प्रमुख भूमिकेत होता.

फर्स्ट पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, आमिर खानची १८६२ कोटी रुपयांची एकूण संपत्तीसह अधिक मालमत्ता आहे. यामधील काही हिस्सा आयरा मिळणार आहे. आयराची एकूण संपत्ती ४.९ कोटी आहे. तिच्यापेक्षा तिचा नवरा नुपूर जास्त श्रीमंत आहे. नुपूरची एकूण संपत्ती ८.२ कोटी रुपये आहे. त्यामुळे लग्नानंतर आयरा-नुपूर १२ कोटींहून अधिक संपत्तीचे मालक झाले आहेत.

हेही वाचा – Video: सईचं कोळी कुटुंबात होतं जोरदार स्वागत, ‘या’ कृतीमुळे सागर जिंकतो मुक्ताचं मन

दरम्यान, आमिर खानचा जावई हा पेशाने फिटनेस ट्रेनर आणि डान्सर आहे. Fitnessismची सुरुवात त्याने केली होती. नुपूरला फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणून ओळखले जाते. आमिर खान, आयराचा तो फिटनेस ट्रेनर होता. तसेच त्याने दशकभर सुष्मिता सेनला फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे. याशिवाय नुपूर पुलकित सम्राट, राणा डग्गुबती आणि अनेक सेलिब्रिटींचा फिटनेस ट्रेनर आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan daughter ira khan and nupur shikhare collective net worth pps