अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री सारा अली खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्याने या चित्रपटाला फ्लॉप म्हटलं आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने सारा आणि विकी ही दोघं पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. इंदूरमधील मध्यमवर्गीय जोडप्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. ही दोघं कॉलेजमध्ये असताना एकमेकांच्या प्रेमात पडतात, घरच्यांच्या संमतीने दोघं लग्न करतात. पण लग्नानंतर त्यांच्यात भांडणं होऊ लागल्यावर ती दोघं घटस्फोट घेण्यापर्यंत पोहोचतात. पण आता या चित्रपटाला आणि विकीला फ्लॉप म्हणत एका प्रसिद्ध अभिनेत्याने प्रदर्शनाच्या आधीच ट्रोल केलं आहे.
हा अभिनेता म्हणजे कमाल आर खान आहे. त्याने ट्वीट करत लिहिलं, “जर तुम्ही फ्लॉप विकी कौशलला चित्रपटात घेतलं म्हणजे चित्रपट फ्लॉप. पण जर फ्लॉप विकी कौशल आणि फ्लॉप सारा अली खानला चित्रपटात कास्ट केलं म्हणजे चित्रपट नक्कीच फ्लॉप होणार. ज्यांच्याकडे जिओचा पैसा आहे ते दिनेश विजनच फक्त हे करू शकतात.” आता त्याचं हे ट्वीट खूप चर्चेत आलं आहे.
हेही वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत बोलू लागली, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात सारा आणि विकीबरोबरच राकेश बेदी, शारिब हाश्मी, नीरज सूद यांसारखे अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकांत दिसणार आहेत.